एका रिचार्जमध्ये चालणार दोन सिमकार्ड! Airtel ने आमदाल दमदार प्लान; 11 फायदेही मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:17 IST2026-01-30T18:17:08+5:302026-01-30T18:17:59+5:30
Airtel ने आपल्या 36 कोटी ग्राहकांसाठी एक खास प्लान आणला आहे.

एका रिचार्जमध्ये चालणार दोन सिमकार्ड! Airtel ने आमदाल दमदार प्लान; 11 फायदेही मिळणार
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Airtel ने आपल्या 36 कोटी ग्राहकांसाठी एक खास पोस्टपेड प्लान सादर केला आहे. ‘Infinity Family Postpaid Plan’ नावाच्या या प्लानमध्ये एकाच प्लानमध्ये दोन सिम कार्ड्स वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, मोठ्या प्रमाणात डेटा आणि अनेक प्रीमियम सब्सक्रिप्शनचा लाभ मिळणार आहे.
एकाच प्लानमध्ये दोन सिम कार्ड्स
Airtelचा हा Infinity Family प्लान 699+GST रुपये प्रतिमहिना दरात उपलब्ध आहे. हा मंथली पोस्टपेड प्लान असून, यात कुटुंबातील दोन सदस्यांना एकाच बिलावर जोडता येते.
या प्लानअंतर्गत:
संपूर्ण भारतात अनलिमिटेड मोफत कॉलिंग
फ्री नॅशनल रोमिंग
दररोज 100 मोफत SMS सुविधा मिळते
डेटा आणि OTT बेनिफिट्स
या प्लानमध्ये एकूण 105GB मासिक डेटा दिला जातो.
75GB डेटा – प्रायमरी सिमसाठी
30GB डेटा – सेकंडरी सिमसाठी
याशिवाय, Airtel या प्लानसोबत अनेक प्रीमियम अॅड-ऑन बेनिफिट्सही देत आहे.
मिळणारे अतिरिक्त प्रीमियम फायदे
Amazon Prime सब्सक्रिप्शन – 6 महिन्यांसाठी
JioHotstar Mobile सब्सक्रिप्शन – 1 वर्षासाठी
Google One (100GB क्लाउड स्टोरेज)
Airtel Xstream Play Premium सब्सक्रिप्शन
Adobe Express Premium – 12 महिन्यांसाठी
Airtel Fraud Detection आणि Spam Protection सुविधा
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना डिजिटल मनोरंजन, क्लाउड स्टोरेज आणि ऑनलाइन सुरक्षेचा एकत्रित फायदा मिळणार आहे. Airtelचा हा 699 रुपयांचा Infinity Family पोस्टपेड प्लान फॅमिली युजर्ससाठी किफायतशीर आणि ऑल-इन-वन पॅकेज ठरू शकतो.