सततच्या नापिकीला कंटाळून दोन शेतकर्यांची आत्महत्या
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
- विदर्भ आणि मराठवाड्यातील घटना
सततच्या नापिकीला कंटाळून दोन शेतकर्यांची आत्महत्या
- विदर्भ आणि मराठवाड्यातील घटनाअकोला/ नांदेड : सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्याने गळफास लावून घेतल्याच्या घटना विदर्भ आणि मराठवाड्यात घडल्या आहेत.अकोल्याच्या रौंदळा येथे शंकर पंढरी अबगड (५०) यांच्याकडे चार एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशीची पेरणी केली होती; परंतु चार एकरात त्यांना केवळ दीड क्विंटल कापूस झाला. गेल्या महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. कर्जबाजारीपणास कंटाळून त्यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले व मुलगी असा परिवार आहे.नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील बावलगाव येथे धम्मदीप गंगाधर कांबळे (३०) या शेतकर्याने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली़ नापिकी व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी व सहा महिन्याची एक मुलगी आहे़