शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Twitter वर आता एका दिवसात 400 पेक्षा जास्त युजर्सना करता येणार नाही फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 11:18 IST

ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ठळक मुद्देट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन बदल करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता ट्विटरने देखील एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांची माहिती दिली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार कोणताही ट्विटर युजर एका दिवसांत 400 हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. याआधी ही मर्यादा 1000 होती. 'फॉलो, अन फॉलो, कोण करते? स्पॅमर. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही 1000 वरून 400 वर आणली आहे. स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही,' असे ट्विटरने ट्वीट करून म्हटले आहे.

Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे. तसेच सोशल मीडियाने निवडणूक आयोगाच्या जागरूकता कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये भारताच्या संसदेचा एक फोटो फीचर करण्यात आला आहे. ट्विटरने लोकसभा निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी पुढे ठेवण्यासाठी एका खास इमोजीची (भावनात्मक संकेत चिन्ह) सुरुवात केली आहे. निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे. मतदानासंदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.

 

टॅग्स :Twitterट्विटरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtechnologyतंत्रज्ञान