Twitter closed thousands of fake accounts around the world; Center in Saudi | ट्विटरने जगभरातून हजारो बनावट खाती बंद केली; सौदीमध्ये केंद्र
ट्विटरने जगभरातून हजारो बनावट खाती बंद केली; सौदीमध्ये केंद्र

नवी दिल्ली : Twitter ने जगभरातून 10 हजारांपेक्षा जास्त खाती कायमची बंद केली आहेत. कंपनीने सांगितले की ही खाती खोटी माहिती आणि प्रचार करत होती. ऑक्टोबर 2018 मध्ये ट्विटरने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राज्याचा पाठिंबा असलेले सुचना संचालनालयाचा खुलासा केला आणि आता एक वर्षानंतर कंपनीने हजारो राजनैतिक प्रेरित खात्यांना हटविल्याची घोषणा केली आहे. 


ट्विटरने म्हटले की, युनायटेड अरब इमिरेट्स आणि इजिप्तच्या 273 खात्यांना बंद केले आहे. ही खाती कोणत्यातारी खास उद्देशाने एकमेकांना जोडलेली होती. तसेच कतात, ईरान सारख्या देशांना समोर ठेवून या खात्यांवरून मोहीम चालविली जात होती. ही खाती सौदीच्या सरकारच्या बाजुने होती. तसेच ही खाती DotDev द्वारे लाचविली जात होती. याबाबतचे पुरावे ट्विटरला मिळाले आहेत. DotDev ही युएई आणि इजिप्तमध्ये कार्यरत असलेली एक खासगी आयटी कंपनी आहे.


ट्विटरने  सांगितले की, त्यांनी DotDev आणि संबंधित खाती कायमची बंद केली आहेत. याशिवाय कंपनीने 4248 वेगवेगळी खाती बंद केली आहेत. ही खाती युएईमधून वापरली जात होती. ज्याचे लक्ष्य येमेन आणि कतार होते. तसेच येमेनमधील युद्ध आणि हाऊथी चळवळीवरून ट्विट केले जात होते. 


ट्विटरने ऑगस्टमध्ये 2 लाख चीनी बनावट खाती शोधली होती. तसेच गेल्या वर्षी 4500 रशियाची खाती बंद केली होती. 


Web Title: Twitter closed thousands of fake accounts around the world; Center in Saudi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.