अलर्ट! काम करताना लॅपटॉप जास्त गरम होतो का?; 'या' गोष्टींकडे द्या लक्ष नाहीतर बसेल मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:45 IST2022-04-21T16:37:35+5:302022-04-21T16:45:27+5:30
Laptop Heating Problem : लॅपटॉपचा वापर वाढल्याने आता तो देखील स्मार्टफोनसारखा गरम होऊ लागला आहे. अनेकांना लॅपटॉप गरम होत असल्याची समस्या जाणवत असते.

अलर्ट! काम करताना लॅपटॉप जास्त गरम होतो का?; 'या' गोष्टींकडे द्या लक्ष नाहीतर बसेल मोठा फटका
नवी दिल्ली - सध्या अनेक कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनप्रमाणेच सध्या लॅपटॉप देखील महत्त्वाचा डिव्हाईस झाला आहे. ऑफिसचे काम करायचे असेल तर लॅपटॉप गरजेचा असतो. तसेच ऑनलाईन क्लास सुरू झाल्याने अनेक पालक देखील आपल्या मुलांना रोजचं लेक्चर अटेंन्ड करण्यासाठी लॅपटॉप देतात. महाविद्यालयीन विद्यार्थी देखील त्यांच्या प्रोजेक्ट आणि अन्य कामांसाठी लॅपटॉपचा वापर करतात. त्यामुळे लॅपटॉपचा वापर आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लॅपटॉपचा वापर वाढल्याने आता तो देखील स्मार्टफोनसारखा गरम होऊ लागला आहे. अनेकांना लॅपटॉप गरम होत असल्याची समस्या जाणवत असते. काही वेळा लॅपटॉप एवढा गरम होतो की त्याचा वापर करणे देखील शक्य नसते आणि त्याचा परफॉर्मेंसवर देखील परिणाम होतो. अनेकदा लॅपटॉपमध्ये काही समस्या असल्यावर अधिक गरम होण्याची समस्या जाणवते. लॅपटॉपला ओवरहिटींगपासून वाचवण्यासाठी काही टिप्स मदत करतात. याबद्दल जाणून घेऊया...
चांगल्या एअरफ्लोसाठी धूळ साफ करा
कंपन्या लॅपटॉपमध्ये व्हेंटिलेशनसाठी सीपीयू पंखे देतात. स्मार्टफोन सारख्या गॅजेट्सच्या तुलनेत लॅपटॉपमध्ये वेळेनुसार धूळ जमा होण्याचा धोका असतो. जर तुमचा लॅपटॉप जास्त गरम होत असल्यास, सर्वात प्रथम एअर वेंट अथवा सीपीयू आणि पूर्ण कूलिंग सिस्टममध्ये धूळ जमा झाली नाही ना? हे पाहा. तुम्ही ही धूळ मऊ ब्रश व कपड्याने साफ करू शकता.
ओरिजनल चार्जरचा वापर करा
लॅपटॉपसोबत आलेल्या मूळ चार्जरचाच वापर करा. बाजारात अनेक थर्ड पार्टी चार्जर्स स्वस्तात उपलब्ध आहेत. मात्र, चार्जरचा उपयोग केल्यास तुमचा लॅपटॉप खराब होऊ शकतो. बनावट चार्जरचा वापर केल्याने लॅपटॉप चार्ज होण्यासाठी देखील जास्त वेळ लागतो व हिटिंगची समस्या निर्माण होते. त्यामुळे नेहमी लॅपटॉपसोबत येणाऱ्या चार्जरचाच वापर करावा.
लॅपटॉप कूलिंग पॅडचा वापर करा
लॅपटॉपमध्ये इंटरनल सीपीयू कूलिंग फॅन दिला जातो. कूलिंग पॅडमुळे लॅपटॉला अतिरिक्त कूलिंग सपोर्ट मिळतो. तुम्ही बाजारातून कूलिंग पॅड खरेदी करू शकता. तसेच, लॅपटॉपला सलग तासंतास वापरण्याऐवजी तुम्ही काही मिनिटं लॅपटॉप बंद देखील ठेवू शकता.
खोली थंड ठेवा
अनेकदा लॅपटॉपमध्ये कोणतीही समस्या नसते. मात्र, तुम्ही ज्या ठिकाणी याचा वापर करत आहात, तेथील तापमान अधिक असल्यास लॅपटॉप देखील गरम होतो. खासकरून उन्हाळ्यात अशाप्रकारची समस्या जाणवते. अशा स्थितीमध्ये तुम्ही खोली थंड राहील याची काळजी घेऊ शकता. लॅपटॉप अधिक गरम होऊ नये यासाठी एसी, कूल आणि पंख्याचा वापर करू शकता.
Apps ऑटो स्टार्ट बंद करा
लॅपटॉप सुरू केल्यानंतर अनेकदा बॅकग्राउंडला अनेक एप्लिकेशन सुरू असतात. लॉग इन दरम्यान अनेक अनावश्यक App आणि सेवा सुरू होतात. यामुळे लॅपटॉपच्या प्रोसेसरवर अधिक लोड येतो. याचा परिणाम परफॉर्मेंसवर देखील होतो. तसेच, लॅपटॉप वापरत असतानाच चार्जिंगला कनेक्ट केले असल्यास देखील समस्या निर्माण होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.