ट्रम्प इफेक्ट! पाकिस्तानी आयफोन घेताना रडणार; किडनीच काय घरदार विकले तरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:24 IST2025-04-09T20:24:02+5:302025-04-09T20:24:24+5:30
अॅपल आपले फोन चीनमध्ये निर्माण करतो. चीनवर अमेरिकेने ५४ टक्के टेऱिफ लावले आहे. आधीच होते त्यात आणखी दोनदा वाढ झाली आहे.

ट्रम्प इफेक्ट! पाकिस्तानी आयफोन घेताना रडणार; किडनीच काय घरदार विकले तरी...
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टेरिफ वॉर आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाले आहे. ट्रम्पनी चीनवर १०४ टक्के कर लावला आहे, तर चीनने ही जोरदार प्रत्यूत्तर देत आधीच्या करात आणखी ८४ टक्क्यांची वाढ केली आहे. या नव्या टेरिफमुळे आयफोनच्या किंमती महाग होणार आहेत. याचा फटका असा की पाकिस्तानमध्ये आयफोनची किंमत १० लाख रुपये होण्याची शक्यता आहे. जोवर जुना स्टॉक आहे तोवर कमी दराने आयफोन मिळतील परंतू, नवीन आयफोनसाठी किडनीच नाही तर घरदार विकले तरी तेवढी किंमत जमा होताना मुश्कील होणार आहे.
अॅपल आपले फोन चीनमध्ये निर्माण करतो. चीनवर अमेरिकेने ५४ टक्के टेऱिफ लावले आहे. आधीच होते त्यात आणखी दोनदा वाढ झाली आहे. यामुळे अॅपलकडे अॅकतर ही वाढीव किंमतीचे नुकसान झेलायचे किंवा त्याचा भार ग्राहकांवर टाकायचा असे दोन पर्याय आहेत. अॅपल काही केल्या आपल्याकडे हा भार घेणार नाही, कारण कंपनी कमी किंमतीत स्मार्टफोन बनविते आणि त्याच्या चार पाच पट किंमतीत विकते.
आयफोनच्या किंमतीत सध्या दहा टक्क्यांची घट झालेली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान दोन्ही अॅपल कंपनीसाठी महत्वाचे आहेत. जर कंपनीने हा टेरिफचा भार ग्राहकांवर टाकला तर आयफोनची किंमत जवळपास ४३ टक्क्यांनी वाढणार आहे. असे झाले तर पाकिस्तानात आयफोन प्रो मॅक्सची किंमत १० लाख रुपयांच्या पुढे जाणार आहे. सध्या आयफोन १६ ची किंमत २ लाख २४ हजार पाकिस्तानी रुपये आहे.
आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत अमेरिकेच्या किंमतीच्या तुलनेत ४,५०,००० पाकिस्तानी रुपये आहे. हा फोन पाकिस्तानात आल्यावर आणखी त्याची किंमत वाढते. पाकिस्तानमध्ये आधीच अमेरिकेपेक्षा ४० टक्के जास्त किंमत असते. हे पाहता आयफोनच्या किंमती या अमेरिकेपेक्षा ८३ टक्के जास्त असणार आहेत. म्हणजेच आयफोन १६ जवळपास सहा लाखांच्या आसपास जाणार आहे. तर आयफोन मॅक्स प्रो १० लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.