त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:58 IST2025-07-14T12:58:03+5:302025-07-14T12:58:13+5:30
मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीत मेगाभरती सुरू केली असून, मोठ्या पॅकेजची नोकरी देत आहे.

त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय?
Meta CEO आणि Facebook चे संस्थापक मार्क झुकरबर्ग Ai च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांनी Google आणि ChatGPT ला आव्हान देण्यासाठी Superintelligence Labs ची घोषणा आधीच केली होती, आता या लॅबसाठी मोठ्या स्तरावर भरती सुरू आहे. अलिकडेच त्यांनी कानपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या त्रपिट बन्सल (Trapit Bansal) नावाच्या तरुणाला १०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पॅकेजची नोकरी दिली होती. त्यानंतर आता त्यांनी या टीममध्ये Apple चा माजी कर्मचारी रुमिंग पँगला (Ruoming Pang) याला सामील केले आहे.
इतक्या कोटींचे पॅकेज
विशेष म्हणजे, Meta ने त्यांना तब्बल 200 मिलियिन अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1670 कोटी रुपये) चे पॅकेज दिले आहे. या पॅकेजसमोर OpenAI मधून Meta मध्ये आलेल्या त्रपित बंसलचे पॅकेज अर्धेच आहे.
Superintelligence Group मध्ये मेगाभरती
सध्या मार्क झुकरबर्ग यांचा Superintelligence Group एकमेव ठिकाण आहे, जिथे मोठमोठ्या पगाराची नोकरी दिली जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मेटाकडून दिले जाणारे हे पॅकेज कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी आणि वेळेत टार्गेट अचिव्ह करण्यासाठी दिले जात आहे. सुपरइंटेलिजेंस लॅबसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बोनस, बेस पगार आणि मेटा स्टॉक...इत्यादींचा समावेश आहे. कर्मचाऱ्याने कंपनी लवकर सोडली किंवा कंपनीचा स्टॉक कमी झाला, तर त्यांचे वेतनही कमी होऊ शकते.
Ai क्षेत्रात OpenAI चे वर्चस्व
AI डेटा अॅनालाइज करणारी वेबसाइट Similarweb च्या रिपोर्टनुसार, Generative AI Tools Traffic मध्ये OpenAI चे मार्केट शेअर 150 मिलियन्सपेक्षा जास्त आहे. तर, Google या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता Meta या दिग्गज कंपन्यांना मागे टाकण्याची योजना आखत आहे.