स्क्रीन टाइम'ला कंटाळलात? लँडलाईनसारखा फोन बनवून या टेक फाउंडरने ३ दिवसांत कमावले ₹ १ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:44 IST2025-12-05T15:43:34+5:302025-12-05T15:44:03+5:30
'स्क्रीन टाइम'च्या व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेतील एका तरुण टेक फाउंडरने अत्यंत वेगळा पण यशस्वी मार्ग शोधला आहे.

स्क्रीन टाइम'ला कंटाळलात? लँडलाईनसारखा फोन बनवून या टेक फाउंडरने ३ दिवसांत कमावले ₹ १ कोटी!
आजच्या जगात स्मार्टफोनच्या स्क्रीनवर तासंतास वेळ घालवण्याची सवय ही मोठी समस्या बनली आहे. या 'स्क्रीन टाइम'च्या व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेतील एका तरुण टेक फाउंडरने अत्यंत वेगळा पण यशस्वी मार्ग शोधला आहे. या फाउंडरने 'लँडलाईन' फोनच्या धर्तीवर एक अत्यंत साधा, आधुनिक पण इंटरनेटमुक्त फोन तयार केला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बाजारात येताच अवघ्या तीन दिवसांत या साध्या फोनची विक्री $१,२०,००० (सुमारे ₹ १ कोटी पेक्षा जास्त) झाली आहे. स्मार्टफोनपासून दूर राहू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या कल्पक उत्पादनाने तत्काळ आकर्षित केले आहे.
आजकाल स्मार्टफोन्समध्ये ईमेल्स, सोशल मीडिया, गेम्स आणि अनंत ॲप्लिकेशन्समुळे लोक सतत 'स्क्रीन'कडे पाहत असतात. या व्यसनावर उपाय म्हणून, या फाउंडरने एक असा फोन बनवला आहे, जो फक्त बोलणे या मूलभूत कार्यावर लक्ष केंद्रित करतो. तो दिसतो जुन्या लँडलाईन फोनसारखा, पण पोर्टेबल आहे आणि त्यात इंटरनेट किंवा ॲप्सचा कोणताही गोंधळ नाही.
बाजारात 'डिजिटल डिटॉक्स' म्हणजेच तंत्रज्ञानापासून थोडा ब्रेक घेण्याची मागणी वाढत असताना, या साध्या फोनने लोकांची गरज ओळखली आणि त्यांना कमी स्क्रीन टाइमसाठी एक सहज उपाय दिला. हा फोन बनवण्यामागची संकल्पना आणि त्याला मिळालेले त्वरित यश हे दर्शवते की, लोकांना आता स्मार्टफोनच्या अति-वापरातून मुक्तता हवी आहे. स्मार्टफोनचा वापर कमी करून जीवन अधिक उत्पादक बनवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा फोन एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
कसा काम करतो?
या लँडलाईन हायटेक फोनची किंमत $90 ते $110 एवढी आहे.
कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथद्वारे आयफोन आणि अँड्रॉइडशी जोडले जातात.
इनकमिंग कॉल: हे डिव्हाइस कॉल आला तसेच व्हॉट्सअॅप, फेसटाइम, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या अॅप्सवरून ऑडिओ/व्हिडिओ कॉल आला की रिंग करते.
आउटगोइंग कॉल: तुम्ही थेट नंबर डायल करू शकतात किंवा नावाने संपर्क डायल करण्यासाठी व्हॉइस असिस्टंट (जसे की सिरी किंवा गुगल असिस्टंट) सक्रिय करण्यासाठी स्टार की (*) वापरू शकता.