TikTok चा फोन लवकरच येणार, लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:41 PM2019-05-28T15:41:41+5:302019-05-28T15:43:24+5:30

टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉक या व्हिडीओ अ‍ॅपवर मालकी हक्क असलेली कंपनी ByteDance आता स्वत: मोबाईल क्षेत्रात उतरणार आहे.

TikTok's parent company planning to launch own smartphone | TikTok चा फोन लवकरच येणार, लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार

TikTok चा फोन लवकरच येणार, लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार

Next
ठळक मुद्देटिक टॉक या व्हिडीओ अ‍ॅपवर मालकी हक्क असलेली कंपनी ByteDance आता स्वत: मोबाईल क्षेत्रात उतरणार आहे. TikTok चा फोन येणार असून हा फोन शाओमी, ओपो आणि विवो यासारख्या लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार.ByteDance ची निर्मिती असलेल्या फोनमध्ये टिक टॉक व इतर अ‍ॅप प्रीलोडेड असणार आहे.

नवी दिल्ली - टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉक या व्हिडीओ अ‍ॅपवर मालकी हक्क असलेली कंपनी ByteDance आता स्वत: मोबाईल क्षेत्रात उतरणार आहे. लवकरच TikTok चा फोन येणार असून हा फोन शाओमी, ओपो आणि विवो यासारख्या लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार आहे. 

टिक टॉक अ‍ॅपची निर्मिती करणारी ByteDance ही कंपनी स्वत: आता मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. या फोनमध्ये ByteDance ची निर्मिती असलेल्या फोनमध्ये टिक टॉक व इतर अ‍ॅप प्रीलोडेड असणार आहे. म्हणजेच स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार नाहीत. तसेच टिक टॉकच्या या फोनमध्ये स्ट्रीमिंग म्यूझिक सर्व्हिस असणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र कंपनीने याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. 

रिपोर्टनुसार, ByteDance ने आपल्या स्मार्टफोनसोबतच प्रोडक्ट पोर्टफोलियो मजबूत करू इच्छित आहे. मात्र या स्मार्टफोनबाबत अधिक डिटेल्स समोर आलेले नाहीत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ByteDance चे सीईओ झांग यिमिंग यांचं खूप दिवसांपासून स्मार्टफोन तयार करण्याचं स्वप्न होतं. त्यामुळेच झांग यिमिंग हे स्वत: मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्नशील होते. 

चीनमधील या कंपनीने मोबाइल निर्मिती करणाऱ्या एका कंपनीशी या वर्षीच करार केला असल्याची बातमी समोर आली आहे. ByteDance चे टिक टॉकसह बातम्या, संगीत, व्हिडिओ आदींशी संबंधित अ‍ॅप्स आहेत. हे सर्व अ‍ॅप या मोबाइलमध्ये प्रीलोडेड असणार आहेत. लवकरच हा फोन लाँच होणार असल्याची शक्यता आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टिक टॉक हा अ‍ॅप तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रामुख्याने टिक टॉक युजर्सना लक्षात ठेवून हा बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. iPhone आणि iPad वर टिक टॉक अत्यंत प्रसिद्ध अ‍ॅप आहे. मोबाइलच्या स्पर्धेत उतरण्यासाठी ByteDance ला जास्त तयारी करावी लागणार आहे. तसेच शाओमी, ओपो, विवो, वन प्लस यासारख्या दिग्गज कंपन्याच्या स्मार्टफोनला हा फोन टक्कर देणार आहे. 

Web Title: TikTok's parent company planning to launch own smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.