अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:43 IST2022-12-30T15:32:28+5:302022-12-30T15:43:42+5:30
Whatsapp मध्ये खूप सेटिंग्स या ऑन असतात. लोकांना या सेटिंग्सबाबत जास्त माहिती नसते. हॅकर्स याचाच फायदा घेतात आणि याच सेटिंगच्या माध्यमातून आपल्या फोननमध्ये सोप्यापद्धतीने एंट्री करतात.

अलर्ट! एका फोटोमुळे हॅक होईल तुमचा फोन अन् WhatsApp; 'ही' सेटिंग ऑन ठेवणं ठरतंय घातक
हॅकर्स दररोज लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत असतात. अशीच एक पद्धत आता GIF इमेजशी संबंधित आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॅकर्स फिशिंग लिंकचा वापर करतात. पण आता हॅकिंगसाठी फिशिंग GIF चा वापर हा अत्यंत खतरनाक ठरत आहे. हॅकर्स याच्याच मदतीने फोनमध्ये शिरत आहेत.
अनेक लोकांच्या Whatsapp मध्ये खूप सेटिंग्स या ऑन असतात. लोकांना या सेटिंग्सबाबत जास्त माहिती नसते. हॅकर्स याचाच फायदा घेतात आणि याच सेटिंगच्या माध्यमातून आपल्या फोननमध्ये सोप्यापद्धतीने एंट्री करतात. जर तुम्ही देखील Whatsapp ही सेटिंग ऑन केली असेल तर हॅकिंगच्या जाळ्यात अडकू शकता.
हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी फिशिंग लिंकचा वापर करायचे. पण आता त्यांनी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. हॅकर्स GIF इमेजने फिशिंग अटॅक इंप्लांट करतात. त्याला GIFShell चं नाव देण्यात आलं आहे. युजर्सच्या एका छोट्याशा चुकीमुळे हॅकर्स Whatsapp आणि फोनचा एक्सेस मिळवू शकतात.
खूप लोकं फोनमध्ये Whatsapp चं Media Auto Download हे फीचर ऑन ठेवतात. जर तुम्ही देखील हे सेटिंग ऑफ केलं नसेल तर अननोन सोर्सकडून येणारे व्हिडीओ, GIF, फोटो आणि फाईल्स य़ा ऑटोमेटिक डाऊनलोड केल्या जातील. हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. युजर्स हे सेटिंग सहजपणे चेंज करू शकतात.
Whatsapp च्या सेटिंगमध्ये जा. तिथे Storage And Data हा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ऑटोमेटिक मीडिया डाऊनलोडचा एक ऑप्शन मिळेल. त्याचं सेटिंग तुम्हाला ऑफ करावं लागेल. या पद्धतीने हॅकर्सची एंट्री तुम्ही रोखू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"