'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:57 IST2025-11-17T16:57:17+5:302025-11-17T16:57:36+5:30
अनेकदा लोकांच्या खासगी चॅट लीक होतात, ज्यामुळे ॲपमध्ये काहीतरी मोठी त्रुटी आहे असे सगळ्यांनाच वाटते.

'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
व्हॉट्सअॅप हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे जगातील सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप मानले जाते. असे असूनही, अनेकदा लोकांच्या खासगी चॅट लीक होतात, ज्यामुळे ॲपमध्ये काहीतरी मोठी त्रुटी आहे असे सगळ्यांनाच वाटते. परंतु, सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युजर्सकडून नकळतपणे होणारी एक साधी चूक, जी त्यांची चॅट इतरांपर्यंत पोहोचवते.
सर्वात मोठी चूक ठरते क्लाउड बॅकअप
बहुतांश लोक फोन बदलल्यास मेसेज डिलीट होऊ नयेत यासाठी आपल्या चॅटचा बॅकअप 'Google Drive' किंवा 'iCloud'मध्ये ऑन ठेवतात. पण, इथेच खरा धोका सुरू होतो.
एन्क्रिप्शनची मर्यादा: एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फक्त तुमच्या फोन आणि मेसेज स्वीकारणाऱ्याच्या फोनपुरतेच मर्यादित असते.
बॅकअपचा धोका: हा बॅकअप क्लाउडवर जातो, जो त्याच एन्क्रिप्शनने सुरक्षित नसतो. याचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या क्लाउड अकाउंटमध्ये प्रवेश मिळवला, तर ती व्यक्ती तुमचा संपूर्ण WhatsApp बॅकअप वाचू शकते. अनेक चॅट लीक होण्याच्या घटनांमध्ये हेच मुख्य कारण समोर आले आहे.
कमकुवत पासवर्ड आणि ओटीपी फसवणूक
अनेक युजर्स त्यांच्या Google किंवा Apple अकाउंटचा पासवर्ड खूप सोपा ठेवतात किंवा प्रत्येक ठिकाणी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो.
याव्यतिरिक्त, ओटीपी स्कॅममध्ये लोक नकळतपणे त्यांच्या अकाउंटचा ॲक्सेस इतरांना देतात. जर तुमच्या क्लाउड अकाउंटमध्ये कोणाला प्रवेश मिळाला, तर तुमचाव्हॉट्सअॅप बॅकअप त्यांना सहज मिळतो.
गॅलरी सिंक आणि स्क्रीनशॉट्स
चॅट नेहमी थेट व्हॉट्सअॅपमधूनच लीक होते असे नाही, तर कधीकधी फोनच्या गॅलरी किंवा स्क्रीनशॉटच्या माध्यमातून बाहेर पसरतात. 'ऑटो मीडिया डाउनलोड' ऑन असल्यास, तुमचे खासगी फोटो, व्हिडीओ किंवा डॉक्युमेंट फोनमधील इतर ॲप्सद्वारे ॲक्सेस केले जाऊ शकतात. कोणतीही चूक किंवा चुकीचे ॲप इन्स्टॉल केल्यास हा डेटा बाहेर जाऊ शकतो.
खासगी चॅट कशी सुरक्षित ठेवाल?
व्हॉट्सअॅप चॅट लीक होण्यापासून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमची डिजिटल सुरक्षा मजबूत ठेवणे.
> क्लाउड बॅकअप बंद ठेवा: क्लाउड बॅकअप एकतर बंद करा किंवा बॅकअप एन्क्रिप्शन ऑन करा.
> मजबूत पासवर्ड आणि 2FA: तुमच्या Google/Apple अकाउंटमध्ये मजबूत पासवर्ड वापरा आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करा.
> ऑटो-मीडिया डाउनलोड: ते बंद ठेवा.
> ओटीपी आणि लिंक: कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा ओटीप कोणाशीही शेअर करू नका.