...तर व्हॉट्स ऍपमुळे तुम्हाला घडेल तुरुंगवास; एक मेसेज पडेल महागात; काळजी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:33 IST2022-04-13T16:31:03+5:302022-04-13T16:33:13+5:30
व्हॉट्स ऍपवर मेसेज करताना सावध राहा; एका चुकीमुळे घडू शकतो तुरुंगवास

...तर व्हॉट्स ऍपमुळे तुम्हाला घडेल तुरुंगवास; एक मेसेज पडेल महागात; काळजी घ्या!
मुंबई: व्हॉट्स ऍपचा वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. स्मार्टफोनचा वापर करणारा जवळपास प्रत्येक जण व्हॉट्स ऍपचा उपयोग करतो. व्हॉट्स ऍपची लोकप्रियता अतिशय जास्त आहे. मात्र व्हॉट्स ऍपचा वापर सावधपणे करायला हवा. अन्यथा तुमची एक चूक तुम्हाला तुरुंगवास घडवू शकते.
व्हॉट्स ऍप हे एक मेसेजिंग ऍप आहे. या माध्यमातून तुम्ही अतिशय सहजपणे तुमच्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला मेसेज करू शकता. अनेकदा कोणीतरी आपल्याला व्हॉट्स ऍपवर ग्रुपमध्ये ऍड करतं. कधीकधी या ग्रुपमधील अनेकजण आपल्या परिचयाचे नसतात. अशावेळी ग्रुपमध्ये कोणताही मेसेज शेअर करताना, मीडिया फाईल पाठवताना दहावेळा विचार करा. अन्यथा तुम्हाला पोलीस कोठडी होऊ शकते. कोर्टात चकरा मारायला लागू शकतात.
व्हॉट्स ग्रुपमध्ये विविध विचारधारेच्या, धर्माच्या, जातीच्या व्यक्ती असतात. त्यापैकी कोणाच्याही भावना तुमच्या मेसेजमुळे, तुम्ही पाठवलेल्या फोटो, व्हिडीओमुळे दुखावल्या जाऊ शकतात. तुम्ही जातीवाचक शब्द, आक्षेपार्ह भाषा वापरल्यास आणि याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यास तुम्हाला आणि ग्रुप ऍडमिनला पोलीस ठाण्यात बोलावलं जाऊ शकतं. दोषी आढळल्यास तुरुंगवास घडू शकतो.