काय सांगता? ९०% लोकांना माहित नाहीत WhatsApp चे 'हे' सीक्रेट फीचर्स, कामं होतील सुपरफास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:17 IST2025-04-04T19:16:35+5:302025-04-04T19:17:04+5:30

WhatsApp फीचर्स फक्त तुमचं काम सुपरफास्ट करत नाहीत तर  WhatsApp एक्सपीरियन्स देखील आणखी चांगला करू शकतात. 

these 5 hidden whatsapp features will change way you use the app speed up your work like magic | काय सांगता? ९०% लोकांना माहित नाहीत WhatsApp चे 'हे' सीक्रेट फीचर्स, कामं होतील सुपरफास्ट

काय सांगता? ९०% लोकांना माहित नाहीत WhatsApp चे 'हे' सीक्रेट फीचर्स, कामं होतील सुपरफास्ट

WhatsApp हा फक्त मेसेजिंग एप राहिलेला नाही तर ते कम्युनिकेशनचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म झाला आहे. जगभरात २ बिलियनहून अधिक लोक WhatsApp  वापरतात, परंतु त्यात अनेक सीक्रेट फीचर्स आहेत ज्यांची बहुतेक युजर्सना माहितीच नाही. हे फीचर्स फक्त तुमचं काम सुपरफास्ट करत नाहीत तर  WhatsApp एक्सपीरियन्स देखील आणखी चांगला करू शकतात. 

टाइप न करता पाठवा मेसेज 

जर तुम्हाला मोठा मेसेज पाठवायचा असेल पण टाइप करायचा नसेल, तर WhatsApp मध्ये व्हॉइस-टाइपिंग फीचर आहे ज्याद्वारे तुम्ही फक्त बोलून मेसेज टाइप करू शकता. ते वापरण्यासाठी, तुम्हाला स्पेस बारजवळ एक मायक्रोफोन आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा. तुम्ही जे काही बोलाल ते आपोआप टेक्स्टमध्ये रूपांतरित होईल. जर कोणताही शब्द चुकीचा असेल तर तुम्ही तो एडिट करून मेसेज पाठवू शकता.

नंबर सेव्ह न करता कोणालाही पाठवा WhatsApp मेसेज

बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीला फक्त एकदाच मेसेज पाठवावा लागतो, पण त्यासाठी आपल्याला नंबर सेव्ह करावा लागतो. यामुळे फोनबुकमध्ये अनावश्यक कॉन्टॅक्ट वाढतात. WhatsApp  एका सीक्रेट फीचरमुळे तुम्ही नंबर सेव्ह न करता कोणालाही डायरेक्ट मेसेज पाठवू शकता. यासाठी, तुमच्या फोनच्या ब्राउझरवर (Chrome/Safari) जा. अॅड्रेस बारमध्ये हे टाइप करा: https://wa.me/91XXXXXXXXXX

XXXXXX च्या जागी, ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज पाठवू इच्छिता त्याचा नंबर एंटर करा.

WhatsApp चं 'पिन चॅट' फीचर

जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा ग्रुपचे मेसेज संदेश नेहमीच वर हवे असतील तर पिन चॅट फीचर खूप उपयुक्त आहे. अशा प्रकारे तुमचे महत्त्वाचे चॅट्स कधीही खाली जाणार नाहीत आणि तुम्हाला ते पुन्हा पुन्हा शोधण्याची गरज भासणार नाही.

ऑटोमॅटीक फोटो, व्हिडीओ डाउनलोड करा बंद

WhatsApp वरील अनेक ग्रुप्स आणि चॅट्समध्ये अनावश्यक फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट्स येत राहतात, ज्यामुळे फोन स्टोरेज भरून जातं. WhatsApp च्या एका सीक्रेट फीचरमुळे तुम्ही ऑटो-डाउनलोड बंद करू शकता जेणेकरून फक्त आवश्यक असलेले मीडिया डाउनलोड केला जाऊ शकेल.

WhatsApp वर स्वतःला पाठवा मेसेज

तुम्हाला WhatsApp वर एक चॅट बॉक्स हवा आहे का जिथे तुम्ही तुमचा स्वतःचा डेटा, नोट्स, रिमाइंडर्स आणि फाइल्स सेव्ह करू शकता, तर WhatsApp मध्ये स्वतःला मेसेज पाठवण्याची सुविधा देखील आहे. असं करून तुम्ही महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स आणि फाइल्स सेव्ह करू शकता.
 

Web Title: these 5 hidden whatsapp features will change way you use the app speed up your work like magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.