शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार 'ही' भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:29 PM

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच तीन नवीन भन्नाट फीचर्स घेऊन येत आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच तीन नवीन भन्नाट फीचर्स घेऊन येत आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनचा वापर करणारे युजर्स या नव्या फीचर्सची चाचणी करू शकतात. कंपनी नवीन फीचर्स ट्राय करण्याचा पर्याय देखील युजर्सना देत आहे. लवकरच युजर्सना हे फीचर्स मिळणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपन युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं या उद्देशाने तीन नवीन फीचर्स आणत आहे. 

आयफोन युजर्ससाठी ऑडिओ प्लेबॅक

आयफोन युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये ऑडिओ प्लेबॅक फीचरचा सपोर्ट मिळणार आहे. बीटा व्हर्जन 2.19.91.1मध्ये युजर्स  व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यात आलेल्या ऑडिओचे नोटिफिकेशन पॉप-अप करून प्ले करू शकतात. त्यामुळे अ‍ॅप ओपन न करता रिसीव्ह झालेले ऑडिओ ऐकायला मिळतील. त्यासाठी नोटिफिकेशन पॉप अप एक्सपान्ड करावं लागेल.  

गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल 

लवकरच युजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकणार आहेत. गुगल असिस्टेंट थर्ड पार्टी चॅटिंग अ‍ॅपच्या मदतीने मेसेज सेंड करण्याची सुविधा देतं. मात्र युजर्स यावरून व्हिडीओ कॉल करू शकत नव्हते. पण आता ते शक्य होणार आहे. गुगल असिस्टेंटवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल हे फीचर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे युजर्स 'Hey Google' सोबत 'Whatsapp Video ( कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव)' सांगून लवकरच व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. 

वेबसाठी अल्बम 

व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीला खूप व्हिडीओ अथवा फोटो पाठवले तर अ‍ॅप त्या फाईल्स एका अल्बमप्रमाणे दाखवतात. व्हॉट्सअ‍ॅप वेबवर अद्याप हे फीचर नव्हतं. मात्र रिपोर्टनुसार लवकरच व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप वेब युजर्ससाठी अशाप्रकारचं नवीन इंटरफेस रोलआऊट करण्यात येणार आहे. 

Whatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं?; आता सर्वच समजणार!

Whatsappच्या 'या' नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉकव्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये  फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन  2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल