लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद 

By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 11:46 AM2021-12-27T11:46:54+5:302021-12-27T11:47:12+5:30

Tecno Pova 5G Phone: Tecno Pova 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Dimensity 900 चिपसेट आणि 6,000mAh battery, असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

Tecno Pova 5G phone launched as companys first 5G phone with Dimensity 900 6000mAh battery 50 mp camera  | लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद 

लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद 

Next

Tecno कंपनी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आतापर्यंत अनेक जबरदस्त 4G Phones सादर केल्यानंतर आता कंपनीनं आपला पहिला 5G Phone सादर केला आहे. Tecno Pova 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Dimensity 900 चिपसेट आणि 6,000mAh battery, असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Tecno POVA 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno POVA 5G मध्ये 6.95 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर लाँच केला गेला आहे. पंच-होल डिजाईनसह येणारा हा फोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित हायओएसवर चालतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8GB वेगवान LPDDR5 RAM आणि 128GB लेस्टस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. या फोनमधील 3 जीबी व्हर्च्युअल रॅममुळे एकूण रॅम 11 जीबी करता येतो.  

फोटोग्राफीसाठी Tecno POVA 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी यात 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटीसह साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या टेक्नो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

Tecno POVA 5G ची किंमत 

Tecno POVA 5G ची किंमत जागतिक बाजारात 289 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. ही किंमत 21,500 भारतीय रुपयांच्या आसपास रुपांतरीत होते. कंपनीचा इतिहास पाहता हा फोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

हे देखील वाचा: 

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Instagram अकॉउंट हॅक झालंय हे कसं पाहायचं? अशाप्रकारे करा हॅकरला बाय बाय

Web Title: Tecno Pova 5G phone launched as companys first 5G phone with Dimensity 900 6000mAh battery 50 mp camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.