शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाने 'WhatsApp' ला फटकारले, झुकरबर्गचे जुने चॅट लीक, वापरकर्त्यांचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:05 IST

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मेटाला फटकारले आहे, यामुळे डेटा गैरवापरावरील वाद पुन्हा सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी मार्क झुकरबर्ग यांच्यासोबतच्या जुन्या चॅट्स शेअर केल्या आहेत, यामध्ये वापरकर्त्यांच्या गोपनीयतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरून मेटा आणि व्हॉट्सअॅपला फटकारले होते. वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते. यानंतर, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी २००४ मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मार्क झुकरबर्ग यांच्या जुन्या चॅट मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. झुकरबर्ग हार्वर्डमध्ये विद्यार्थी होते आणि त्यांनी नुकतेच फेसबुक सुरू केले होते.

लिबिया हादरले! गद्दाफीच्या मुलाला घरात घुसून मारले; ४ बंदूकधाऱ्यांनी शरीराची चाळण केली...

स्क्रीनशॉटमध्ये झुकरबर्ग इतर विद्यार्थ्यांकडून ईमेल पत्ते, फोटो, पत्ते आणि सामाजिक सुरक्षा क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती गोळा करण्याबद्दल विनोद करताना दिसत आहेत. लोक झुकरबर्ग यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करत होते. हे चॅट बऱ्याच वर्षापूर्वीचे आहे पण आता हे चॅट टेलिग्रामच्या सीईओंनी शेअर करुन त्या चर्चा घडवून आणली आहे.

टेलिग्रामच्या सीईओंच्या पोस्टमुळे खळबळ उडाली

टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांनी चॅट शेअर करत लिहिले की, तेव्हापासून बदललेली एकमेव गोष्ट म्हणजे त्याचे प्रमाण. त्यांच्या मते, पूर्वी काही हजार लोक होते, परंतु आता फेसबुककडे अब्जावधी लोकांचा डेटा आहे. त्यांची टीका स्पष्टपणे मेटावर होती, त्यांच्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी आहे. आज, व्हॉट्सअॅपचा मालक ४,००० लोकांवर नाही तर ४ अब्ज लोकांवर हसत आहे जे त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवतात.

व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेच्या दाव्यांवर वापरकर्त्यांनी किती विश्वास ठेवावा असा प्रश्न डुरोव्ह यांनी उपस्थित केला. व्हॉट्सअॅप म्हणते की संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत, म्हणजेच फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच ते वाचू शकतो.  मेटा अजूनही इतर माहिती गोळा करू शकते, जसे की तुम्ही कोणाशी आणि किती वेळा संवाद साधता. असे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Slams WhatsApp; Zuckerberg's Old Chats Leaked, Users Worried

Web Summary : Supreme Court criticized WhatsApp over privacy. Zuckerberg's old chats about collecting user data surfaced, raising concerns. Telegram's CEO highlighted Facebook's data practices, questioning WhatsApp's privacy claims and end-to-end encryption promises, as Meta gathers user interaction data.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गSupreme Courtसर्वोच्च न्यायालय