शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 11:56 IST

Stumble Guys: भारतातील कित्येक मुला-मुलींमध्ये हा गेम प्रसिद्ध आहे. ‘स्टंबल गाईज गेम’ खेळताना शेवटपर्यंत टिकून राहायचं इतकंच काय ते डोक्यात ठेवायचं असतं. या गेमचे कंट्रोल्स अगदी साधे आणि सोपे आहेत.

- समीर गुडेकर (गेमिंग अभ्यासक) 

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तकेशिस कॅसल या जपानी गेम शोबद्दल कधी ना कधी तरी ऐकलंच असेल किंवा पाहिलेदेखील असेल. जसे या गेममध्ये वेगवेगळ्या आणि पुढे कठीण होत जाणाऱ्या अडथळ्यांवर मात करून शेवटपर्यंत पोहोचायचे असते, अगदी तसेच काहीसे स्टंबल गाईज या गेममध्ये आपल्याला खेळायला मिळते.

नेटफ्लिक्सवरील स्किड गेम नावाची एक कोरियन वेब सिरीजही याच थीमवर आधारित आहे. अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीवर आधारलेला स्टंबल गाईज हा बॅटल रॉयल गेम आहे. २०२०मध्ये कितका गेम्स या कंपनीने रिलीज केलेला हा गेम २०२२ पर्यंत चार कोटी लोकांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यात आला. अत्यंत सोपा त्याचबरोबर उत्सुकता वाढवणारा हा मोबाइल गेम कंप्युटर गेम फॉल गाईजवरून प्रेरित आहे.

गुंतागुंतीची रचना भारतातील कित्येक मुला-मुलींमध्ये हा गेम प्रसिद्ध आहे. स्टंबल गाईज गेम खेळताना शेवटपर्यंत टिकून राहायचं इतकंच काय ते डोक्यात ठेवायचं असतं. या गेमचे कंट्रोल्स अगदी साधे आणि सोपे आहेत. हा गेम ग्राफिकली चांगला आहे. सोबतीला आकर्षक संगीत आहे. त्याचबरोबर थोडी गुंतागुंतीची रचना या गेममध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. 

तीन फेऱ्यांमधून विजेत्याची निवडतब्बल ३२ जणांना एकत्रितपणे हा गेम खेळता येण्याजोगा आहे. या ३२ जणांपैकी फक्त एकटा विजेता ठरतो. त्या एका विजेत्याला निवडण्यासाठी एकूण तीन फेऱ्या होतात. पहिल्या फेरीमध्ये ३२ जण एकत्र खेळतात. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये ३२ पैकी फक्त १६ जण पुढे जातात आणि शेवटच्या फेरीमध्ये फक्त आठ जण जातात. आता आठ जणांपैकी एक जण विजेता ठरतो.

स्वतःला खाली पडू द्यायचं नाहीगेम खेळणाऱ्या ३२ जणांची चढाओढ ही मॅप्समध्ये होते. या मॅप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्तथरारक अडथळे असतात. या अडथळ्यांना पार करत करत विजयी रेषा पार करायची असते. काहीवेळा तर आपल्याला स्वतःला पडू द्यायचं नसतं. शेवटपर्यंत स्वतःला जो सावरून ठेवेल तो विजयी ठरतो. हा गेम खेळत असताना आपण स्वतःला खाली पडू द्यायचं नाही, ही दक्षता आपण घ्यायची असते.

काही खास टीप्स गेममधील साऱ्या मॅप्स आणि अडथळ्यांची आधीच माहिती करून घेणे.अडथळ्यांवरून उडी मारताना त्याचे योग्य नियोजन करणे आणि संधी साधून योग्यवेळी उडी मारणे.सुरुवातीला खाली पडण्यापासून स्वतःला थांबवू नका. आपल्याला चेकपॉइंटपासून पुन्हा गेममध्ये नवी सुरुवात करता येते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान