शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वनप्लस ५ टी च्या विक्रीस प्रारंभ : ६ व ८ जीबीच्या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध

By शेखर पाटील | Published: November 28, 2017 5:10 PM

वनप्लस कंपनीच्या वनप्लस ५ टी या दणदणीत फिचर्स असणार्‍या स्मार्टफोनच्या विक्रीस प्रारंभ झाला असून हे मॉडेल ६ व ८ जीबी रॅमच्या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच वनप्लस ५ टी या मॉडेलचे अनावरण हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये मिळणार ‘अमेझॉन इंडिया’ आणि ‘वन प्लस स्टोअर’ या शॉपिंग पोर्टलवर विक्री

वनप्लस कंपनीच्या वनप्लस ५ टी या दणदणीत फिचर्स असणार्‍या स्मार्टफोनच्या विक्रीस प्रारंभ झाला असून हे मॉडेल ६ व ८ जीबी रॅमच्या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच वनप्लस ५ टी या मॉडेलचे अनावरण करण्यात आले होते. हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. याच्या ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ३२,९९९ तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेलचे मूल्य ३७,९९९ रूपये आहे. हे दोन्ही मॉडेल्स ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ आणि ‘वन प्लस स्टोअर’ या शॉपिंग पोर्टलवरून आजपासून उपलब्ध करण्यात आले आहेत.

वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये ६.०१ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५डी फुल ऑप्टीक डिस्प्ले असेल. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल. वनप्लस ५ टी मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स सोनी आयएमक्स३९८ सेन्सरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह २० मेगापिक्सल्स सोनी आयएमएक्स३७६के सेन्सरयुक्त देण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांसाठी ड्युअल एलईडी फ्लॅशची सुविधा असेल. याच्या मदतीने ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के तर ६० फ्रेम्स प्रति सेकंद गतीने फुल हाय डेफिनेशनचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमएक्स३७१ सेन्सरयुक्त फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग करणे शक्य आहे. 

वनप्लस ५ टी स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन ओएस ४.७.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे. म्हणजेच याचा उपयोग करून चेहर्‍याच्या मदतीने स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्याची सुविधा यात आहे. वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये कंपनीच्या डॅशचार्ज हा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल