रंगांचा सण होळी नुकताच पार पडला. रंगांच्या या उत्साहात अनेकदा आपण फोनची काळजी घ्यायला विसरतो. कोणाच्या तरी अंगावर पाणी उडवताना किंवा रंगात खेळताना तुमचा महागडा स्मार्टफोन पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल, तर आता टेन्शन घेऊ नका. फोन पाण्यात पडणे म्हणजे मोठे नुकसान असे आपल्याला वाटते, कारण बहुतेक कंपन्या 'लिक्विड डॅमेज'वर वॉरंटी देत नाहीत. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगली तर तुमचा फोन पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
फोन पाण्यात पडल्यावर काय करावे?
त्वरीत स्विच ऑफ करा: फोन पाण्यातून काढल्याबरोबर सर्वात आधी तो स्विच ऑफ करा. फोन चालू राहिल्यास शॉर्ट सर्किट होऊन तो कायमचा खराब होऊ शकतो. फोन जास्त हलवू नका.
कव्हर आणि अॅक्सेसरीज काढा: फोनवर कव्हर असेल तर ते लगेच काढून टाका. तसेच सिम कार्ड ट्रे, मेमरी कार्ड आणि इतर कोणतीही जोडेलेली वस्तू बाहेर काढा, जेणेकरून हवा आत जाऊ शकेल.
कोरड्या कपड्याने पुसा: फोन एका मऊ आणि कोरड्या कापडाने वरून पूर्णपणे पुसून घ्या. चार्जिंग पोर्ट आणि हेडफोन जॅकच्या ठिकाणी जमा झालेले पाणी कापसाने टिपून घेण्याचा प्रयत्न करा.
हवादार ठिकाणी ठेवा: फोन पुसल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगली हवा खेळती असेल. फोन पूर्णपणे सुकेपर्यंत तो चार्जिंगला लावू नका किंवा चालू करण्याचा प्रयत्न करू नका.
विसरूनही 'या' चुका करू नका
१. हेअर ड्रायरचा वापर टाळा: अनेक जण फोन सुकवण्यासाठी ड्रायर वापरतात. ड्रायरची गरम हवा फोनच्या नाजूक अंतर्गत भागांना वितळवू शकते किंवा डॅमेज करू शकते.२. फोन जोरात झटकू नका: पाणी काढण्यासाठी फोन हलवणे किंवा झटकणे चुकीचे आहे. यामुळे बाहेर असलेले पाणी फोनच्या अधिक खोलवर जाऊ शकते.३. उन्हात ठेवू नका: कडक उन्हात फोन ठेवल्याने त्याची बॅटरी आणि स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते.
तरीही फोन सुरू झाला नाही तर?
जर २४ तास सुकवल्यानंतरही तुमचा फोन सुरू होत नसेल, तर स्वतः प्रयोग न करता अधिकृत सर्व्हिस सेंटरवर घेऊन जाणेच हिताचे ठरेल. घरगुती उपायांपेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास फोन दुरुस्त होण्याची शक्यता अधिक असते.
Web Summary : Dropped your phone in water? Switch it off immediately, remove accessories, and dry it gently. Avoid using a hairdryer or shaking it. If it doesn't turn on after drying, seek professional help.
Web Summary : पानी में फोन गिरने पर तुरंत स्विच ऑफ करें, एक्सेसरीज निकालें और धीरे से सुखाएं। हेयर ड्रायर का उपयोग न करें और फोन को झटके नहीं। ठीक न होने पर सर्विस सेंटर जाएं।