काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:22 PM2020-06-29T15:22:16+5:302020-06-29T15:30:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे. बाजारात विविध पद्धतीचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र आता एका कंपनीने एक भन्नाट मास्क तयार केला असून तो इंटरनेटशी कनेक्ट करता येणार आहे.

smart face mask for corona connected smartphone via bluetooth call | काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल

काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेक ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं असून न लावल्यास दंड भरावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे. बाजारात विविध पद्धतीचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र आता एका कंपनीने एक भन्नाट मास्क तयार केला असून तो इंटरनेटशी कनेक्ट करता येणार आहे.

जपानची स्टार्टअप कंपनी डोनट रोबोटिक्स (Donut Robotics) ने स्मार्ट मास्क तयार केलं आहे. इंटरनेटशी कनेक्टेड असलेला हा मास्क फोन आणि मेसेजसाठीही मदत करणार आहे. स्मार्ट फेस मास्क मेसेज ट्रान्सलेट करतो. 8 भाषेत मेसेज ट्रान्सलेट करण्याचे आणि कॉल करण्याचं काम हा फेस मास्क करतो. कंपनीने नवीन मास्कला 'c-mask' नाव दिले आहे. पांढऱ्या रंगाचा हा मास्क असून प्लास्टिकपासून तयार केला आहे. 

मास्क स्मार्टफोनच्या ब्लूटूथसोबत कनेक्ट करावा लागणार आहे. त्यानंतर ते मोबाईलमध्ये ऑपरेट करता येईल. कमांड मिळताच हा मास्क फोन कॉलही करू शकतो. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सी मास्क हा दररोजच्या मास्कवर घालता येतो. कोरोना संकटाचा सामना करीत असताना इंजिनियर्सना ही आयडिया सूचल्याची माहिती मिळत आहे. सी मास्क ची किंमत 40 डॉलर म्हणजेच जवळपास तीन हजार रुपये आहे. कंपनी सप्टेंबरपासून बाजारात 5 हजार मास्क आणण्याच्या तयारीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनीही एक हटके मास्क तयार केला आहे. कोरोनापासून वाचवणारा LED मास्क तयार करण्यात आला आहे. हटके  मास्कमध्ये एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. बोलताना तोंडाची हालचाल होईल त्यानुसार लाईट्स असणार आहेत. त्यामुळेच जेव्हा हसतो तेव्हा मास्कही हसताना दिसणार आहे. मास्कवर चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन दिसणार आहेत. एका मास्कची किंमत जवळपास 3800 रुपये आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...

CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी

CoronaVirus News : 'त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला, मी आता जगणार नाही'; 'तो' Video शेअर करून रुग्णाने सोडला जीव 

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात

CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा

"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"


 

Web Title: smart face mask for corona connected smartphone via bluetooth call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.