"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:33 AM2020-06-29T08:33:11+5:302020-06-29T08:38:39+5:30

प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा त्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आल्या आहेत.

Born from foreign women can never be patriotic, says Pragya Singh Thakur | "विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"

"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"

googlenewsNext

भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा त्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आल्या आहेत. नाव न घेता त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींना टोला लगावला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'काँग्रेसला सभ्यता आणि संस्कृती याचं वावडं आहे. त्यांच्याकडे देशभक्ती नाही. त्यांच्यात कशी येणार देशभक्ती? कारण त्यांनी दोन दोन देशांचं सदस्यत्व घेतलं आहे. जे विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आले ते देशभक्त असूच शकत नाहीत' असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता.

'काँग्रेसने नऊ वर्षांत केलेल्या छळामुळे मला अनेक जखमा झाल्या, तर अनेक जखमा नव्याने ताज्या झाल्या. या त्रासामुळे माझ्या डोळ्यांना त्रास झाला व मेंदूला सूज देखील आली. माझ्या एका डोळ्याने मला अजिबात दिसत नाही, तर दुसऱ्या डोळ्यानेसुद्धा अंधुक दिसत आहे' असं प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी झालेल्या तुरुंगवासाचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. 

प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा

Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट

CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी खास उल्लेख केलेली 'ती' व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

CoronaVirus News : पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा रंगला पण नवरदेवाच्या वडिलांना 6 लाखांचा दंड ठोठावला

Web Title: Born from foreign women can never be patriotic, says Pragya Singh Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.