स्लो इंटरनेटमुळे त्रस्त आहात....ही हलकी अॅप वापरा आणि खूष व्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:36 PM2018-08-23T14:36:10+5:302018-08-23T14:53:46+5:30

मोबाईल वापरकर्त्यांची अडचण ओळखून या कंपन्यांनी त्यांच्या अॅपची छोटी आवृत्ती आणली आहे.

Slow is troubled by the Internet .... Use this lightweight app and be happy ... | स्लो इंटरनेटमुळे त्रस्त आहात....ही हलकी अॅप वापरा आणि खूष व्हा...

स्लो इंटरनेटमुळे त्रस्त आहात....ही हलकी अॅप वापरा आणि खूष व्हा...

Next

आज आपली छोटीमोठी सर्व कामे स्मार्टफोनवरील अॅपवर अवलंबून आहेत. बँकेचे पैसे हस्तांतरण करायचे असोत की  बातम्या पहायच्या असोत, फेसबुकवर वेळ घालवायचा असो यासारखी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी वेगवेगळी अॅप वापरावी लागतात. यामुळे फोनची स्पेस आणि डाटाही खूप लागतो. परंतू तुम्हाला माहित आहेत का, या प्रकारातून काहीसा दिलासाही मिळू शकतो....या अॅपची काही लाईट व्हर्जनही उपलब्ध आहेत. चला पाहुयात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपबाबत.

भारतात फोरजी आले तरीही अद्याप मोठमोठ्या शहरांमध्येही टुजीची रेंज मिळते. यामुळे मोठी अॅपवर डाटा लोड होत नाही. तसेच मोबाईलची रॅम, मेमरी स्पेसही कमी असल्याने फोन स्लो होऊन जातो. आज काल प्रत्येकाच्या फोनमध्ये कमीतकमी 40 अॅप्स असतात. यामध्ये गुगलची बायडिफॉल्ट अॅपही असतात. ही अॅप काही दिवसांतच पुन्हा अपडेटही करावी लागतात. आणि प्रत्येक अपडेटमध्ये जागाही चांगलीच घेतात. मोबाईल वापरकर्त्यांची अडचण ओळखून या कंपन्यांनी त्यांच्या अॅपची छोटी आवृत्ती म्हणून काही अॅप आणली आहेत. 

फेसबुक लाईट


फेसबुकने स्वत:चे फेसबुक अॅप लाँच केले होते. मात्र, हे अॅप खूप डाटा घ्यायचे. एवढा डेटा डाऊनलोड करण्यासाठी थ्रीजी, फोरजीची रेंजही चांगली असावी लागते. यामुळे फेसबुकने तेव्हा जावा ऑपरेटींग सिस्टिम असलेल्या मोबाईलवर अवघ्या 150 केबीमध्ये सुस्साट चालणारे फेसबुक लाईट अॅप विकत घेतले. यानंतर 2015 मध्ये फेसबुकने हे अॅप अँड्रॉइडसाठी आणले. हे अॅप खूप कमी डेटा वापरत असल्याने ते टूजीच्या रेंजवरही चांगले चालते. फक्त यामध्ये काही सुविधा कमी करण्यात आल्या आहेत. आता या अॅपची साईज 1.34 एमबी आहे.

मेसेंजर लाइट


फेसबुकचे मेसेजिंगसाठी वेगळे अॅप आहे. फेसबुक मॅसेंजर लाइट हे या अॅपची कमी जागा, डेटा लागणारी आवृत्ती आहे. या अॅपची साईज 8.07 एमबी आहे, हे अॅप स्लो इंटरनेट असलेल्या भागात ठीकठाक काम करते. 

ट्विटर लाइट


ट्विटरचेही मोठ्या अॅपसह लाइट अॅप आहे. या अॅपची साईज 0.93 एमबी आहे. हे अॅप ट्विटरने याच महिन्यात भारतात लाँच केले आहे. या अॅपवर डाटा थ्रीजी, टुजीच्या नेटवर्कवर पटकन डेटा लोड होतो.

गुगल गो


गुगलच्या या सर्च इंजिनच्या अॅपचे गुगल गो हे लाईट व्हर्जन अॅप आहे. हे अॅप कमी स्टोरेज आणि धीमे इंटरनेट असलेल्या ठिकाणी पटकन सर्च करते. तसेच सर्च केल्यानंतर रिझल्ट दाखिवण्याच्या प्रक्रियेदरम्यान 40 टक्के डाटा वाचविला जातो.  

उबर लाइट


शहरांमध्ये कॅब, टॅक्सी पुरविणाऱ्या उबर या कंपनीनेही आपले लाइट अॅप आणले आहे. या अॅपला जून 2018 मध्ये लाँच करण्यात आले आहे. या अॅपची साइज 5 एमबी आहे. हे अॅप 300 मिलीसेकंदांमध्ये प्रतिसाद देते. धीमे इंटरनेट असलेल्या भागात वापरण्यासाठी हे अॅप बनविण्यात आले आहे. सध्या उबर लाईट जयपूर, हैदराबाद आणि दिल्ली या तीन शहरांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यासारखेच ओलानेही ओला लाइट हे अॅप आणले आहे. 

अॅमेझॉन इंटरनेट


शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉननेही आपले लाइट अॅप आणले आहे. हे अप ब्राऊझर सारखे काम करते. याचे व्हर्जन 2.4 एमबी आहे. या अॅपद्वारे इंटरनेट ब्राउजिंग, न्यूज़ अपडेटही पाहू शकतो.


गुगल मॅप गो


शहरांमध्ये एखादे ठिकाण शोधण्यासाठी सर्वाधीक वापरले जाणारे अॅप म्हणजे गुगल मॅप. मात्र, रेंज कमी असल्यास हे अॅप कामच करत नसल्याने बऱ्याचदा खोळंबा होतो. यामुळे गुगलने गुगल मॅप गो हे लाइट अॅप आणले आहे. 
 

Web Title: Slow is troubled by the Internet .... Use this lightweight app and be happy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.