Signal heavy not WhatsApp; A new app that appeals to youth around the world | व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप

व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप

व्हॉट्सॲपने धोरणात बदल करण्यापासून एक पाऊल मागे घेतले असले तरी आता व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल यांच्यात तुलना होऊ लागली आहे. यात सिग्नल ॲप भारी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिग्नल डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जाणून घेऊन काय आहे सिग्नल ॲप...

व्हॉट्सॲप संदेश आणि कॉल्सच एन्क्रिप्ट करत असेल परंतु सिग्नल त्यापुढे एक पाऊल जाऊन केवळ संदेश आणि कॉल्सच नव्हे तर मेटाडेटाही एन्क्रिप्ट करते. म्हणजे ते पाहात नाही.

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन

  • एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसाठी सिग्नल ओपन सोर्स प्रोटोकॉलची अंमलबजावणी करते
  • गोपनीयतेच्या बाबतीत सिग्नल हे ॲप टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपपेक्षाही उजवे आहे
  • तुमच्या व्यक्तिगततेचे सर्व बाजूंनी संरक्षण व्हावे यासाठी सिग्नल ‘सील्ड सेंडर’ नावाचे नवीन टूल देऊ करते
  • ‘सील्ड सेंडर’मुळे कोणी कोणाला कधी आणि किती वेळा मेसेजेस पाठवले हे केवळ त्या दोन व्यक्तींपुरताच मर्यादित राहील. सिग्नलचे निर्माताही ते पाहू शकणार नाहीत
  • त्याचबरोबर काही अतिरिक्त फीचर्स अशी आहेत सिग्नलमध्ये की ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेचे पूरेपूर रक्षण होते
  • ब्लर फेसेस -अलीकडेच सिग्नलने ब्लर फेसेस नावाचे नवीन फीचर ॲड केले आहे. त्यामुळे इमेजेस पाठविण्यापूर्वी आपोआपच त्यातील फोटो ब्लर होतात
  • सर्व प्रकारच्या लोकल फाइल्स सिग्नल चार अंकी पासवर्डने एन्क्रिप्ट करते

Web Title: Signal heavy not WhatsApp; A new app that appeals to youth around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.