Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:31 PM2021-10-06T15:31:02+5:302021-10-06T15:33:08+5:30

Xiaomi Imagery Awards 2021 या कॉन्टेस्टची कंपनीनं घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबर ही याची अखेरची तारीख आहे. 

SHOW THE WORLD YOUR BEST XIAOMI SHOTS AND WIN A PRIZE | Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग

Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग

Next
ठळक मुद्देXiaomi Imagery Awards 2021 या कॉन्टेस्टची कंपनीनं घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबर ही याची अखेरची तारीख आहे. 

जर तुम्हाला फोटोग्राफीची (Photography) आवड आहे आणि तुम्ही मोबाईलद्वारे फोटोही काढत असाल, तर Xiaomi ही कंपनी मोठं बक्षीस जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. कंपनीनं आपल्या Xiaomi Imagery Awards 2021 ची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्ही शाओमीच्यास्मार्टफोन्सद्वारे काढलेले फोटो ३० नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी पाठवू शकता. या स्पर्धेतील विजेत्याला कंपनी ५ हजार डॉलर्सचं बक्षीस देणार आहे. 

यावेळी या स्पर्धेसाठी 'हॅपी मुमेंट्स' ही थीम निवडण्यात आली आहे. या थीमशी संबंधित कोणताही व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. यासाठी कंपनीनं आपल्या वेबसाईटवर एक इव्हेंट पेजही क्रिएट केलं आहे. यासाऑी अट अशी की तुम्ही काढलेला फोटो हा Xiaomi किंवा Redmi च्या स्मार्टफोन्समधूनच काढलेला असला पाहिजे.

काय आहेत अटी?
या स्पर्धेसाठी अखेरची तारीख ३० नोव्हेंबर आहे. तसंच यामध्ये तुम्हाला रेडमी शाओमीच्या फोनमधून घेण्यात आलेले २० फोटो आणि जास्तीतजास्त ५ व्हिडीओ अपलोड करू शकता. फोटोची साईज ३०० केबी आणि व्हिडीओ ३० एमबीपर्यंत असला पाहिजे. तसंच त्याच्या EXIF मध्ये माहिती असणं अनिवार्य आहे. भारतीय रुपयांनुसार विजेत्याला ३, ७२ लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. तसंच भाग घेणाऱ्यांपैकी काहींना निरनिराळ्या वस्तूंसह  Xiaomi Mi 11 T आणि Xiaomi 11T Pro देण्यात येतील.

Web Title: SHOW THE WORLD YOUR BEST XIAOMI SHOTS AND WIN A PRIZE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.