रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:59 IST2025-09-07T14:58:09+5:302025-09-07T14:59:00+5:30

रात्री वाय-फाय बंद केल्यामुळे अनेक फायदे होतात जे बहुतेक लोकांना माहित नाहीत.

should wifi be turned off at night 99 people do not know its benefits know full information | रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...

रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...

आजकाल इंटरनेट आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. दिवस असो वा रात्र, प्रत्येक घरात वाय-फाय चालू असतं. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्स इंटरनेटशिवाय अपूर्ण वाटतात. पण रात्री झोपताना वाय-फाय चालू ठेवणं खरोखर आवश्यक आहे का असा विचार तुम्ही कधी केला आहे का? खरं तर, रात्री वाय-फाय बंद केल्यामुळे अनेक फायदे होतात जे बहुतेक लोकांना माहित नाहीत.

काय आहेत फायदे? 

आरोग्याला याचा मोठा फायदा होतो. अनेक वैज्ञानिक संशोधनातून असं दिसून आलं आहे की, सतत वाय-फाय सिग्नलमध्ये राहिल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाच्या (२०२४) रिपोर्टनुसार, वाय-फाय जवळ झोपणाऱ्या सुमारे २७ टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या असतात. रात्री वाय-फाय बंद केल्यास मेंदूला रेडिओ वेव्सच्या संपर्क कमी येतो आणि झोप चांगली लागते. यामुळे शरीराला नीट विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्यक्तीला अधिक ताजेतवानं वाटतं.

सायबर सिक्योरिटीपासून संरक्षण

दुसरा फायदा सायबर सुरक्षेशी संबंधित आहे. जेव्हा वाय-फाय रात्रभर चालू असतं, तेव्हा तुमचं नेटवर्क हॅकिंग आणि नको असलेल्या लॉगिनसाठी खुलं असतं. बऱ्याचदा लोक झोपताना लक्ष देत नाहीत की दुसरे कोणीतरी त्यांचं नेटवर्क वापरू शकतं. वाय-फाय बंद केल्याने डेटा चोरी आणि प्रायव्हसीला धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

विजेची बचत

तिसरा फायदा म्हणजे विजेची बचत होते. वाय-फाय राउटर जास्त वीज वापरत नसला तरी, तो २४ तास चालवल्याने वर्षभरात बरेच युनिट खर्च होतात. जर तुम्ही रात्री तो बंद करण्याची सवय लावली तर वीज बिल देखील कमी होईल.

याशिवाय, वाय-फाय बंद केल्याने गॅझेट्सचं आयुष्य देखील वाढतं. ते सतत चालू ठेवल्याने राउटर आणि कनेक्टेड डिव्हाइसेसवर दबाव येतो, ज्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं. परंतु जर त्यांना रात्रभर विश्रांती मिळाली तर ते बराच काळ चांगलं काम करतात.
 

Web Title: should wifi be turned off at night 99 people do not know its benefits know full information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.