शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

सूर्याच्या किरणांपासून पाणी शुद्ध करण्याचं नवीन तंत्रज्ञान विकसित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 15:00 IST

सध्या वातावरणातील वाढत्या प्रदुषणासोबतच पाण्याची कमतरताही भासत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे नद्या कोरड्या पडत आहेत आणि त्यामुळे अनेक गांवांपर्यंत पाणी पोहोचत नाही.

सध्या वातावरणातील वाढत्या प्रदुषणासोबतच पाण्याची कमतरताही भासत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे नद्या कोरड्या पडत आहेत आणि त्यामुळे अनेक गांवांपर्यंत पाणी पोहोचत नाही. याव्यतिरिक्त जे काही पाणी अस्तित्वात आहे ते अत्यंत अस्वच्छ आहे. ते स्वच्छ करण्यासाठी सरकारचे कोट्यावधी रूपये खर्च होतात. सध्या महाराष्ट्रातही पाऊस कमी पडल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. ज्यामध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यामधील दुषित घटक दूर करण्यात येणार आहेत. जर्मनीमध्ये मार्टिन ल्यूथर विश्वविद्यालय हेले विटेनबर्गमधील संशोधकांनी, पाण्यामधील दूषित घटकांना हटवण्यासाठी पाण्यामध्ये सहजपणे सोडण्यासाठी गतिशील इलेक्ट्रॉन्स म्हणजेच हायड्रेटेड इलेक्ट्रॉन्सचा वापर केला. 

एमएलयूमध्ये प्रोफेसर मार्टिन गोएजाने सांगितले की, 'हे इलेक्ट्रॉन फारा प्रतिक्रियाशील आहेत आणि त्यामुळे पाण्यामध्ये प्रतिक्रिया घडवून आणण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. हे इलेक्ट्रॉल अत्यंत धोकादायक अशा दूषित घटकांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी इलेक्ट्रॉल्सना आण्विक यौगिकांमधून सोडलं जातं. एका अणूने (Atom) दुसऱ्या अणूवर इलेक्ट्रॉन (Transfer of electron)स्थानांतर करण्यामुळे तयार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (Chemical bond)आण्विक यौगिका असं म्हटलं जातं.  तिथे त्यांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येतं. आतापर्यंत असे इलेक्ट्रॉल तयार करणं अत्यंत अवघड आणि खर्चिक होतं. 

संशोधकांनी एक नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. ज्यामध्ये ऊर्जेचा एकमेव स्त्रोत म्हणून ग्रीन लाइट एमिटिंग डायोडची गरज असते. अशी प्रक्रिया करण्यासाठी उत्प्ररेक म्हणून व्हिटॅमिन सी आणि धातू मिश्रणाचा वापर करतात. 

या नवीन प्रणालीची पुढे तपासणी केल्यानंतर समजले की, हायड्रेट इलेक्ट्रॉन तयार करण्याची ही एक सक्षम पद्धत आहे. त्याचबरोबर याचे अनेक उपयोग आहेत. संशोधकांनी या नवीन पद्धतीचा वापर प्रदूषित पाण्यावर केला. छोट्या प्रमाणावर करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे पाण्यातून प्रदुषित घटक हटवण्यासाठी मदत मिळाली. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण