इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:26 IST2025-12-12T13:26:04+5:302025-12-12T13:26:55+5:30
तुम्हालाही इंस्टाग्रामवर वारंवार निरुपयोगी आणि एकाच प्रकारच्या रील्सचा कंटाळा आला आहे का?

इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
तुम्हालाही इंस्टाग्रामवर वारंवार निरुपयोगी आणि एकाच प्रकारच्या रील्सचा कंटाळा आला आहे का? आता इंस्टाग्रामने युजर्सची ही मोठी समस्या सोडवण्यासाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण फीचर आणले आहे. या नवीन सेटिंगमुळे युजर्सना त्यांच्या रील्स फीडवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे.
नवीन फीचर काय आहे?
इंस्टाग्राम नेहमी युजर्सच्या आवडीनुसार रील्स दाखवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरते. परंतु, अनेकदा अल्गोरिदम चूक करतो आणि त्याच त्याच प्रकारचा कंटेट दाखवतो. आता कंपनीने युजर्सना स्वतःच्या आवडीनुसार अल्गोरिदम ट्यून करण्याची सोय दिली आहे.
कसे काम करेल हे नवीन फीचर?
या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय निवडता येतील, ज्यामुळे इंस्टाग्राम केवळ तुम्हाला आवडेल असाच कंटेट दाखवेल.
नवीन आयकॉन: रील्स टॅबवर जा. तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात दोन ओळी आणि हृदयाचा एक नवीन आयकॉन दिसेल.
विषयांची यादी: या आयकॉनवर टॅप करताच, इंस्टाग्राम तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये रस आहे, अशा विषयांची एक मोठी यादी तुमच्यासमोर येईल.
कंट्रोल मिळवा: या यादीतून तुम्ही कोणते विषय कमी पाहायचे आणि कोणते विषय जास्त पाहायचे हे निवडू शकता. तुम्ही तुमच्या आवडीचे विषय शोधू शकता, जोडू शकता किंवा न आवडणारे विषय वगळू शकता. तुमच्या पसंती बदलताच, रील्सच्या शिफारसी त्वरित तुमच्या आवडीनुसार बदलतील.
अल्गोरिदम शेअर करण्याची सोय!
यासोबतच एक खास फीचर देखील देण्यात आले आहे, ते म्हणजे तुम्ही तुमचा हा कस्टमाइज्ड अल्गोरिदम दुसऱ्या युजर्ससोबत शेअर करू शकता. म्हणजे, तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेट पाहता हे तुमचे फॉलोअर्स तुमच्या स्टोरीवर पाहू शकतील.
कोणाला वापरता येणार?
सध्या हे नवीन फीचर प्रायोगिक तत्त्वावर फक्त अमेरिकेत लॉन्च करण्यात आले आहे. पण लवकरच ते इंग्रजी भाषेसह जगभरात उपलब्ध होईल. भविष्यात हे फीचर 'एक्सप्लोर पेज' आणि ॲपच्या इतर भागांमध्येही लागू करण्याची कंपनीची योजना आहे. या नवीन सेटिंगमुळे युजर्सचा इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक व्यक्तिगत आणि चांगला होणार आहे.