सॅमसंगचा पुढील फोन सहा कॅमेऱ्यांचा; 5 जी देखिल असणार...पाहा कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:46 IST2018-11-21T14:45:19+5:302018-11-21T14:46:02+5:30
सॅमसंगचे प्रिमिअम श्रेणीतील एसचे फोन दरवर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच होतात.

सॅमसंगचा पुढील फोन सहा कॅमेऱ्यांचा; 5 जी देखिल असणार...पाहा कोणता?
भारतात नोकियाचे संस्थान खालसा करणाऱ्या कोरिअन कंपनी सॅमसंगला चीनी कंपन्यांनी तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. मात्र, तरीही सॅमसंग या कंपन्यांना पुरून उरत आहे. सॅमसंगने मंगळवारी चार कॅमेरांचा 'क्वाड कॅमेरा' केवळ 36 हजारांत लाँच केला असतानाच आता चक्क सहा कॅमेरांच्या फोनची चर्चा सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे हा फोनही याच कंपनीचा असणार आहे.
सॅमसंगचे प्रिमिअम श्रेणीतील एसचे फोन दरवर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच होतात. पुढील वर्षी Galaxy S10 या फोनमध्ये 6 कॅमेरा आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. यामध्ये S10 चे चार मॉडेल येणार आहेत. यापैकी तीन मॉडेल मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये लाँच केले जाणार आहेत. सॅमसंगने चौथे मॉडेल 'Beyond X' या नावाने लाँच होईल.
Beyon X मध्ये 5जी तंत्रज्ञान असणार आहे. या मॉडेलला 6 कॅमेरे असतील. पुढे दोन आणि मागे 4 कॅमेरे असणार आहेत. यातील इतर मॉडेलना 3 किंवा 5 कॅमेरे मिळण्याची शक्यता आहे.
सॅमसंग इन्फिनिटी-यू आणि इन्फिनिटी-व्ही डिस्प्लेवर काम करत आहे. यामुळे पुढील प्रिमिअम फोनमध्ये यापैकी एक स्टाईल नॉच मिळण्याची शक्यता आहे.