या आठवड्यात लॉन्च होतोय सॅमसंगचा सर्वात पॉवरफुल फोन; जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:48 IST2026-02-22T14:47:37+5:302026-02-22T14:48:07+5:30
200MP कॅमेरा अन् 1 TB पर्यंत स्टोरेज मिळणार!

या आठवड्यात लॉन्च होतोय सॅमसंगचा सर्वात पॉवरफुल फोन; जाणून घ्या फीचर्स...
सॅमसंग आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S26 सीरीज येत्या बुधवारी लॉन्च करणार आहे. या सीरीजअंतर्गत Samsung Galaxy S26, Galaxy S26 Plus आणि Galaxy S26 Ultra हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. दमदार कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसर आणि प्रीमियम डिस्प्ले ही या सीरीजची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
25 जुलैला Samsung Galaxy Unpacked इव्हेंट
सॅमसंगकडून 25 जुलै रोजी Galaxy Unpacked इव्हेंट आयोजित करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात Galaxy S26 सीरीजचे अनावरण होणार आहे. कंपनीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणारा Galaxy S26 Ultra या इव्हेंटचे मुख्य आकर्षण ठरेल. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, अत्याधुनिक प्रोसेसर आणि उत्कृष्ट दर्जाचा डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे.
लॉन्च ट्रेंड : तीन मॉडेल्स बाजारात
पूर्वीच्या ट्रेंडनुसार सॅमसंग दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात Galaxy S सीरीज सादर करत आली आहे. यंदाही कंपनी Samsung Galaxy S26, S26 Plus आणि S26 Ultra हे तीन मॉडेल्स बाजारात आणणार आहे. Samsung Galaxy Unpacked Event हा सॅन फ्रान्सिस्को येथे 25 फेब्रुवारी रोजी होणार असून, भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम रात्री 11:30 वाजता सुरू होईल.
अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S26
6.3-इंच Full HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट
Corning Gorilla Armor 2 प्रोटेक्शन
Samsung Galaxy S26 Plus
6.7-इंच QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले
Gorilla Armor 2 स्क्रीन प्रोटेक्शन
Samsung Galaxy S26 Ultra
6.9-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले
Corning Gorilla Armor 2 प्रोटेक्शन
200MP प्रायमरी कॅमेरा
प्रोसेसर, RAM आणि स्टोरेज
फ्लॅगशिप मॉडेल Samsung Galaxy S26 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात येणार आहे. हा प्रोसेसर खास सॅमसंग स्मार्टफोनसाठी कस्टमाइज करण्यात आला आहे. यामध्ये कमाल 16GB RAM आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.