तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:52 IST2025-09-24T18:52:04+5:302025-09-24T18:52:44+5:30
सॅमसंगने भारतात आता ‘एआय होम-फ्यूचर लिव्हिंग नाऊ’ (AI Home: Future Living Now) ही नवी संकल्पना आणली आहे.

तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंगने भारतात आता ‘एआय होम-फ्यूचर लिव्हिंग नाऊ’ (AI Home: Future Living Now) ही नवी संकल्पना आणली आहे. याच्या माध्यमातून आता तुमचं घर अधिक स्मार्ट आणि ऑटोमेटेड होणार आहे. तुमच्या एका कमांडवर, क्लिकवर फोनच्या मदतीने घरातील सर्व कामं एआय करेल. त्यामुळे टेन्शन घेण्याची आता गरजच नाही.
सॅमसंगच्या या नव्या उपक्रमात गॅलेक्सी एआय (Galaxy AI) आणि व्हिजन एआय (Vision AI) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टथिंग्स (SmartThings) इकोसिस्टमच्या मदतीने घरातील सर्व उपकरणं एकमेकांशी जोडली जातील. यामुळे तुमच्या घरातील एसी, वॉशिंग मशिन, टीव्ही आणि इतर उपकरणं आपोआप काम करतील. हे तंत्रज्ञान तुमच्या सवयी आणि परिसरातील वातावरणाचा अभ्यास करून त्यानुसार काम करणार आहे.
ऑफिसवरून घरी गेल्यावर आपल्याला खूप गरम होतं. आधीच एसी कोणीतरी सुरू केला असता तर बरं झालं असतं असं हमखास वाटतं. सॅमसंगच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरी येण्याआधीच तुमच्या घरातील एसी सुरू करू शकता, लाईट्स सुरू होतील आणि खूप छान स्वागत केलं जाईल. एसीसोबतच तुम्ही फ्रीज, वॉशिंग मशीनला देखील कमांड देऊ शकता. फ्रीजमध्ये असलेल्या वस्तू, त्याची एक्सपायरी डेट आणि रेसिपीजची देखील माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
'एआय होम'चे फायदे
सॅमसंगने 'एआय होम'मध्ये चार मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये सोपं जीवन (Ease), काळजी (Care), विजेची बचत (Save) आणि सुरक्षितता (Secure) याचा समावेश आहे.
सोपं जीवन
घरातील लाईट्स, एसी, वॉशिंग मशीन ऑन-ऑफ करणं, रुमचं टेम्परेचर कंट्रोल करणं आणि इतर लहान-मोठी कामं आपोआप होतील. यामुळे जगण सोपं होईल.
काळजी
सॅमसंगने हे तंत्रज्ञान तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी खासकरून डिझाईन केलं आहे. यामध्ये चांगल्या झोपेसाठी वातावरण तयार करणं, न्युट्रिशियन प्लॅनिंग आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची सुविधाही आहे
विजेची बचत
स्मार्टथिंग्स एनर्जीमुळे विजेची बचत करणं सोपं होईल आणि त्यामुळे तुमचं विजेचं बिलही कमी येईल.
सुरक्षितता
नॉक्स वॉल्ट (Knox Vault) सारख्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या घरातील सर्व डेटा सुरक्षित राहील.
सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क यांनी "सॅमसंग एआय होमच्या लाँचसह आम्ही भारतातील घराघरांमध्ये फ्यूचर लिव्हिंग आणत आहोत, ज्यामुळे दैनंदिन राहणीमान अधिक सोईस्कर, आरोग्यदायी व सुरक्षित होईल. भारतासाठी अर्थपूर्ण आणि सुरक्षित तंत्रज्ञान तयार करणं ही आमची कटिबद्धता आहे. या ‘एआय होम’मुळे भारतीयांचं जीवनमान अधिक सुधारेल आणि त्यांचं भविष्य अधिक स्मार्ट होईल" असं म्हटलं आहे.