शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह सादर होणार Samsung Galaxy Tab S8 सीरीज; लाँच होऊ शकतात तीन टॅबलेट 

By सिद्धेश जाधव | Published: August 21, 2021 11:54 AM2021-08-21T11:54:47+5:302021-08-21T11:59:07+5:30

Galaxy Tab S8 Series: सॅमसंग आपली नवीन Tab S8 सीरिजमध्ये क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर देणार आहे. या सीरिजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 असे तीन डिवाइस सादर करण्यात येतील.  

Samsung galaxy tab s8 series may come with snapdragon 898 chipset  | शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह सादर होणार Samsung Galaxy Tab S8 सीरीज; लाँच होऊ शकतात तीन टॅबलेट 

प्रतीकात्मक फोटो. सौजन्य: goodereader

Next
ठळक मुद्देGalaxy Tab S8 टॅबलेट या सीरिजमधील सर्वात छोटा डिवाइस असेल.Galaxy Tab S8 साठी सॅमसंगच्या चाहत्यांना 2022 पर्यंत वाट बघावी लागेल.  

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी आपल्या Galaxy Unpacked इव्हेंटच्या माध्यमातून दोन फोल्डेबल स्मार्टफोन सादर केले आहेत. आता Samsung Galaxy Tab S8 सीरीजचे लिक्स समोर येऊ लागले आहे. या नवीन फ्लॅगशिप टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 असे तीन डिवाइस सादर केले जाऊ शकतात. याआधी देखील या टॅबलेट सीरिजच्या स्पेसीफाकेशन्सचा खुलासा झाला होता. परंतु, या लिक्समधून प्रोसेसरची ठोस माहिती मिळाली नव्हती. सॅमसंग आपला एक्सिनोस प्रोसेसर देईल अशी अपेक्षा होती. आता आलेल्या लिक्समध्ये ही सीरिज क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह सादर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.  

प्रसिद्ध टिप्सटर Ice Universe ने Samsung Galaxy Tab S8 Ultra, Tab S8+ आणि S8 टॅबलेट्समध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर असेल अशी माहिती दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉम प्रोसेसर असेल. क्वॉलकॉमने हा प्रोसेसर अजून लाँच केलेला नाही. हा प्रोसेसर या वर्षाच्या अखेरीस सादर केला जाईल, त्यामुळे यावर्षी ही टॅबलेट सीरिज बाजारात दाखल होणार नाही. Galaxy Tab S8 साठी सॅमसंगच्या चाहत्यांना 2022 पर्यंत वाट बघावी लागेल.  हे देखील वाचा: 23 ऑगस्टला भारतात येणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन; Realme C21Y फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध

Samsung Galaxy Tab S8 Ultra चे लीक स्पेसिफिकेशन्स  

याआधी आलेल्या लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. यात 120Hz चा हाय रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी या टॅबमध्ये वर सांगितल्याप्रमाणे स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट दिला जाऊ शकतो. ज्याला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजची जोड दिली जाऊ शकते. या टॅबच्या बॅक पॅनलवर 13MP चा मुख्य सेन्सर आणि 5MP चा सेकंडरी सेन्सर असेलला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या टॅबमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा मिळेल, ज्यात 8MP चा मुख्य सेन्सर आणि 5MP चा अल्ट्रावाईड अँगल कॅमेरा असू शकतो. Galaxy Tab S8 Ultra मध्ये 12,000mAh ची 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.  

Samsung Galaxy Tab S8+ चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Tab S8+ मध्ये 12.4 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात येईल. यात देखील स्नॅपड्रॅगॉन 898 चिपसेट मिळू शकतो. हा टॅब 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. यात एकच 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल, रियर कॅमेरा सेटअप अल्ट्रा व्हेरिएंटसारखा असेल. यातील बॅटरीची क्षमता 10,090mAh असू शकते.  हे देखील वाचा: WhatsApp च्या या फिचरमुळे आपोआप वाचणार तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज; जाणून घ्या कसे वापरायचे हे फिचर

Samsung Galaxy Tab S8 चे लीक स्पेसिफिकेशन्स  

Galaxy Tab S8 टॅबलेट या सीरिजमधील सर्वात छोटा डिवाइस असेल. याचे बाकी सर्व स्पेक्स प्लस व्हेरिएंटसारखे असतील फक्त यात 11 इंचाचा LTPS TFT डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. तसेच यात 8,000mAh ची बॅटरी देण्यात येईल.  

Web Title: Samsung galaxy tab s8 series may come with snapdragon 898 chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.