23 ऑगस्टला भारतात येणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन; Realme C21Y फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 06:58 PM2021-08-20T18:58:11+5:302021-08-20T19:00:36+5:30

Realme C21Y India Launch: रियलमी सी21वाय स्मार्टफोन येत्या 23 ऑगस्टला भारतात लाँच केला जाईल, अशी घोषणा रियलमीने केली आहे.

realme C21Y India Launch on 23 August specs price offer sale on flipkart  | 23 ऑगस्टला भारतात येणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन; Realme C21Y फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध 

23 ऑगस्टला भारतात येणार रियलमीचा बजेट स्मार्टफोन; Realme C21Y फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध 

googlenewsNext
ठळक मुद्देरियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे.हा फोन Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो.  

Realme लवकरच भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Realme C21Y नावाने सादर केला जाईल. हा रियलमीचा Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 असलेला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन जुलैमध्ये वियतनाममध्ये लाँच झाला होता. रियलमी सी21वाय स्मार्टफोन येत्या 23 ऑगस्टला भारतात लाँच केला जाईल, अशी घोषणा रियलमीने केली आहे. Realme C21Y साठी एक प्रोडक्ट पेज देखील फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आले आहे.  

Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स  

Realme C21Y मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे आणि हा डिस्प्ले 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे. हा फोन Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो.  हे देखील वाचा: Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी Realme C21Y मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी Realme C21Y मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  हे देखील वाचा: WhatsApp च्या या फिचरमुळे आपोआप वाचणार तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज; जाणून घ्या कसे वापरायचे हे फिचर

Realme C21Y ची किंमत  

रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 3,990,000 वियतनामी डाँग म्हणजे 13,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. भारतात देखील या फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास असू शकते. 

Web Title: realme C21Y India Launch on 23 August specs price offer sale on flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.