Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9a मध्ये टक्कर; कोणता फोन बेस्ट? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 20:04 IST2025-10-29T20:00:03+5:302025-10-29T20:04:05+5:30
परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्स अनुभवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी बाजारात मोठी स्पर्धा सुरू झाली.

Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9a मध्ये टक्कर; कोणता फोन बेस्ट? पाहा
परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्स अनुभवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी बाजारात मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सॅमसंगने नुकताच जागतिक स्तरावर आपला नवीन Galaxy S25 FE लाँच केला आहे, जो थेट 'फ्लॅगशिप किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगल पिक्सेल ए९ ला आव्हान देत आहे. दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्ससह येतात. चला, या दोन्ही पॉवर-पॅक्ड हँडसेटमधील फरक आणि दोन्हीपैकी कोणता फोन तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो, हे पाहूया.
सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफई: खासियत
उत्कृष्ट कॅमेरा सेटअप: सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफईमध्ये ५०MP प्रायमरी, १२MP अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो लेन्स (८MP, 3x ऑप्टिकल झूम) असा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. विशेषतः टेलिफोटो लेन्समुळे पोर्ट्रेट आणि झूम फोटोग्राफीमध्ये हा फोन Pixel 9a पेक्षा अधिक सक्षम आहे.
फास्ट चार्जिंग: ४५W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन ३० मिनिटांत ६५ टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. Pixel 9a च्या २३W चार्जिंगच्या तुलनेत हा मोठा फायदा आहे.
डिझाइन आणि सेक्युरीटी: केवळ ७.४ मिमी जाडीमुळे हा फोन अधिक स्लिम आहे आणि डिस्प्ले संरक्षणासाठी यात अधिक मजबूत Corning Gorilla Glass Victus 2 चा वापर केला गेला आहे.
गुगल पिक्सेल ९ ए: खासियत
दीर्घकाळ अपडेट्स: गुगलने या फोनसाठी सात वर्षांच्या OS अपडेट्सचे आश्वासन दिले आहे, जो दीर्घकाळ वापरकर्त्यांना नवीन फीचर्सचा लाभ देईल.
बॅटरी आणि ब्राइटनेस: यात थोडी मोठी ५१०० mAh बॅटरी आणि २७०० निट्सची पीक ब्राइटनेस आहे, ज्यामुळे सूर्यप्रकाशात स्क्रीन अधिक स्पष्ट दिसते.
सिक्युरिटी: गुगलच्या स्वतःच्या Titan M2 सिक्युरिटी चिपमुळे डेटा अधिक सुरक्षित राहतो.
तज्ज्ञांचे मत काय?
- तुम्हाला सर्वोत्तम कॅमेरा, जलद चार्जिंग आणि स्लिम डिझाइन हवा असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी एस २५ एफई निवडा.
- जर तुमची प्राथमिकता सात वर्षांपर्यंतचा सॉफ्टवेअर सपोर्ट, उत्कृष्ट डिस्प्ले ब्राइटनेस आणि थोडी मोठी बॅटरी असेल, तर Google Pixel 9a एक उत्तम निवड ठरू शकतो.