सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:56 IST2025-08-09T17:53:35+5:302025-08-09T17:56:36+5:30

Samsung Galaxy S24 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल ५० हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे.

Samsung Galaxy S24 Ultra Price Drops by Rs 50k on Amazon, Flipkart; How to grab crazy deals | सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल ५० हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे. २०० मेगापिक्सेल कॅमेरा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स फिचर्ससह हा फोन बाजारात दाखल झाला. पंरतु, आता हा फोन लाँचिंग किंमतीपेक्षा खूपच कमी दरात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. सध्या हा फोन सध्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर या फोनच्या किंमतीत सुमारे १५ हजारापर्यंतचा फरक पाहायला मिळतो.

अॅमेझॉन वर हा फोन सध्या ९७ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत १ लाख ३४ हजार ९९९ रुपये आहे. म्हणजेच, ग्राहकांना सुमारे ३३ हजारांपर्यंत सवलत मिळत आहे. याशिवाय, ग्राहकांना तीन हजारांपर्यंत कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे. तर, फ्लिपकार्टने या फोनच्या किंमतीत थेट ५३ हजारांची कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन अवघ्या ८१ हजार ८८९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. शिवाय, या फोनवर ५ टक्के कॅशबॅक, एक्स्चेंज बोनस आणि ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: डिस्प्ले

सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन ६.८-इंचाचा क्वाड एचडी+ डिस्प्लेसह येतो, जो १२० हर्ट्झ हाय रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटला सपोर्ट करतो. हा फोन आयपी६८ रेटिंगसह येतो, ज्यामुळे फोन पाण्यात बुडूनही खराब होणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: कॅमेरा

या फोनच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात २०० एमपीचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय यात ५० एमपी अल्ट्रा वाइड, १२ एमपी टेलिफोटो आणि १० एमपी मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १२ एमपी कॅमेरा मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: स्टोरेज

सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आहे. फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित वनयूआयवर काम करतो. यात गॅलेक्सी एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: बॅटरी

या फोनमध्ये ५००० एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे, ज्यामध्ये ४५ वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग देण्यात आले आहे. त्याच वेळी, फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देखील उपलब्ध आहे.

Web Title: Samsung Galaxy S24 Ultra Price Drops by Rs 50k on Amazon, Flipkart; How to grab crazy deals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.