शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

उरले काही दिवस! निम्म्या किमतीत मिळतोय Samsung चा प्रीमियम 5G फोन, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 6:30 PM

Samsung Galaxy S22 5G Price Sale: 9 डिसेंबरपासून सुरू झालेला Flipkart चा सेल 16 डिसेंबरला संपणार आहे.

Samsung Galaxy S22 5G Price Sale: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Big Year End Sale चा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये अनेक फ्लॅगशिप फोन अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. सॅमसंगचा गेल्या वर्षी लॉन्च झालेला फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S22 देखील या सेलमध्ये जवळपास निम्म्या किमतीत मिळतोय. 9 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल 16 डिसेंबरला संपणार आहे. 

हा स्मार्टफोन 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय. कंपनीने लॉन्चिंगवेळी याची किंमत 72 हजार रुपये ठेवली होती. या फोनमध्ये दमदार बॅटरी, आकर्षक कॅमेरा आणि उत्कृष्ट डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीच्या बाबतीत हा फोन आयफोनसारख्या प्रीमियम फोन्सलाही टक्कर देतो. गेमिंगसाठीही हा फोन अतिशय चांगला आहे.

Samsung Galaxy S22 5G ची किंमतसॅमसंगच्या या फोनवर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. तुम्ही हा सूमारे अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता. ब्रँडने हा फोन गेल्या वर्षी, म्हणजे 2022 मध्ये 72,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांना मिळतोय. ही किंमत फ्लॅट डिस्काउंटसह आहे. म्हणजेच यावर तुम्हाला कोणतेही कार्ड किंवा कूपन वापरावे लागणार नाही.

फोनचे फीचर्सया किंमतीत फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. याशिवाय कंपनी HDFC कार्डवर 10 टक्के अतिरिक्त सूट देत आहे. फोनमध्ये 6.1-inch AMOLED डिस्प्ले मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. यात ट्रिपल कॅमरा सेटअप मिळतो. मेन लेन्स 50MP, सेकंडरी लेन्स 12MP आणि तिसरा कॅमेरा 10MP चा आहे. याशिवाय, फ्रंटमध्ये 10MP सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने यात 3700mAh बॅटरी दिली आहे. तसेच, 25W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो.

का घ्यावा?तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम फोन हवा असेल, तर तुम्ही हा खरेदी करू शकता. हा फोन कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे. यावर तुम्हाला Android 14, 15 आणि Android 16 पर्यंतचे अपडेट्स मिळतील. हा चांगल्या आयपी रेटिंगसह येतो. एकूणच हा फोन एक चांगला पर्याय आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट