Samsung Galaxy M17e 5G: भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच एक मिड-रेंज फोन येणार आहे. Samsung Galaxy M17e 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख सॅमसंगने जाहीर केली आहे. हा फोन येत्या 17 मार्च रोजी भारतात लॉन्च केला जाणार असून, यात मोठी बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि नवीन सॉफ्टवेअर असे अनेक आकर्षक फीचर्स मिळणार आहेत.
कंपनीच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन रोजच्या वापरासाठी, एंटरटेनमेंट आणि स्मूथ परफॉर्मन्स लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने अद्याप फोनची किंमत जाहीर केलेली नाही; मात्र हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये येण्याची शक्यता आहे.
हा फोन Vibe Violet आणि Blitz Blue या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. लॉन्चनंतर हा स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
6.7 इंच 120Hz डिस्प्ले
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडिओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ होतो. डिस्प्लेमध्ये अॅडॅप्टिव ब्राइटनेस आणि हाय ब्राइटनेस मोड देखील दिला आहे. फोनची जाडी सुमारे 8.2mm असून, त्यामध्ये Glass Fibre Reinforced Polymer बॅक पॅनल देण्यात आले आहे. तसेच या डिव्हाइसला IP54 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे धूळ आणि हलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षण मिळते.
दमदार प्रोसेसर अन् नवीन Android
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरमध्ये 2 Cortex-A76 परफॉर्मन्स कोर (2.4GHz), 6 Cortex-A55 एफिशिएंसी कोर (2.0GHz) आहेत. ग्राफिक्ससाठी ARM Mali-G57 GPU देण्यात आला आहे, जो मल्टिमीडिया आणि कॅज्युअल गेमिंगसाठी योग्य मानला जातो.
हा स्मार्टफोन Android 16 आधारित One UI 8 वर चालेल. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनला 6 Android अपडेट्स आणि 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. यामध्ये Samsung Knox Vault सुरक्षा प्रणालीदेखील दिली आहे.
50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही बॅटरी व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया वापर आणि दैनंदिन कामांसाठी दीर्घ बॅकअप देऊ शकते.
AI फीचर्सही मिळणार
या फोनमध्ये Google Gemini AI, Circle to Search आणि Now Bar सारखी स्मार्ट फीचर्स देखील देण्यात आली आहेत, ज्यामुळे युजरचा अनुभव अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर होणार आहे. एकंदरीत, मोठी बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि नवीन सॉफ्टवेअर सपोर्टमुळे Samsung Galaxy M17e 5G हा फोन मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करू शकतो.
Web Summary : Samsung Galaxy M17e 5G launches March 17 in India. It features a 6.7-inch 120Hz display, MediaTek Dimensity 6300 processor, 50MP camera, and 6000mAh battery. The phone offers Vibe Violet and Blitz Blue colors, Android 16-based One UI 8, and AI features.
Web Summary : सैमसंग गैलेक्सी M17e 5G भारत में 17 मार्च को लॉन्च होगा। इसमें 6.7 इंच 120Hz डिस्प्ले, मीडियाटेक डाइमेंशन 6300 प्रोसेसर, 50MP कैमरा और 6000mAh बैटरी है। फोन में वाइब वायलेट और ब्लिट्ज ब्लू रंग, Android 16 आधारित वन यूआई 8, और एआई फीचर्स हैं।