शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण

By शेखर पाटील | Updated: May 22, 2018 13:06 IST

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे. शाओमीच्या झंझावाताला तोंड देण्यासाठी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने या कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे ८ (२०१८) या मॉडेलचे अनावरण केले आहे. सॅमसंगच्या अलीकडील बहुतांश मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले दिलेला असतो. या पार्श्‍वभूमिवर, गॅलेक्सी जे ८ मध्येही याच प्रकारचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल कॅमेरा सेटअपदेखील असेल. याच्या मागील बाजूस एफ/१.७ अपर्चरयुक्त १६ मेगापिक्सल्स तसेच एफ/१.९ अपर्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्हींच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे ८ या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये कोर्टेक्स ए५३ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून मायक्रो-एसडीच्या मदतीने याला वाढविण्यात येणार आहे. तर यामध्ये ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असेल. 

सॅमसंग गॅलेक्सी जे ८ या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. बाजारपेठेत हे मॉडेल १८,९९० रूपये मूल्यात मिळणार आहे.

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञान