लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता
By सिद्धेश जाधव | Updated: June 25, 2021 18:37 IST2021-06-25T18:35:32+5:302021-06-25T18:37:19+5:30
Samsung Detachable Display Smartphone: Samsung चा हा डिटॅचेबल डिस्प्ले असेल फोन आयताकृती असेल. स्मार्टफोनचा डिटॅचेबल डिस्प्ले डेट, टाइम, नोटिफेशन आणि इतर माहिती दाखवण्याचे काम करेल.

डिटॅचेबल डिस्प्ले फोनशी कनेक्ट करण्यासाठी मॅग्नेटिक पिन्स देण्यात येतील.
Samsung नेहमीची अनोख्या स्मार्टफोन्सच्या कॉन्सेप्टवर काम करत असते. अश्याच एका जगावेगळ्या स्मार्टफोनची माहिती आता समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये डिटॅचेबल डिस्प्ले देण्यात येईल. सॅमसंगने या स्मार्टफोनचा पेटंट वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशन (WIPO) वर केले आहे, जे सर्वप्रथम 91mobiles ने स्पॉट केले आहे.
2018 मध्ये फाईल करण्यात आलेला हा पेटंट या आठवड्यात प्रकाशित करण्यात आला आहे. या पेटंटसोबत काही इमेजेस फाईल करण्यात आल्या आहेत. या इमेजेसवरून या स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे. या फोनच्या डिस्प्लेचा वरचा भाग फोनपासून वेगळा करता येईल. तसेच हा वेगळा केलेला डिस्प्ले मनगटावर एखाद्या बँड किंवा घड्याळाप्रमाणे बांधता येईल.
या डिटॅचेबल डिस्प्लेच्या डाव्या बाजूला दोन बटण आहेत. हे बटन्स डिटॅचेबल डिस्प्ले वापरण्यासाठी नेव्हिगेशनचे काम करू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. हा छोटा डिस्प्ले मुख्य स्मार्टफोनशी ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट होईल. Samsung चा हा डिटॅचेबल डिस्प्ले असेल फोन आयताकृती असेल. स्मार्टफोनचा डिटॅचेबल डिस्प्ले डेट, टाइम, नोटिफेशन आणि इतर माहिती दाखवण्याचे काम करेल. या डिटॅचेबल डिस्प्लेच्या मदतीने स्मार्टफो कंट्रोल देखील करता येईल.
डिटॅचेबल डिस्प्ले फोनशी कनेक्ट करण्यासाठी मॅग्नेटिक पिन्स देण्यात येतील. याच पिन्सच्या माध्यमातून हा छोटा डिस्प्ले स्मार्टफोनच्या मदतीने चार्ज होईल. सॅमसंगने असा स्मार्टफोन प्रत्यक्षात बाजारात दाखल करेल कि नाही हे सांगणे कठीण आहे. परंतु या स्मार्टफोनची डिजाईन निश्चितच जगावेगळी आहे.