SIM Card Rule : पंतप्रधान कार्यालयाने दूरसंचार विभागाला (DoT) एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. यानुसार, आता सर्व नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकजण बनावट कागदपत्रांद्वारे अवैध सिमकार्ड खरेदी करायचे आणि या सिम कार्डचा चुकीच्या पद्धतीने किंवा गुन्ह्यांसाठी वापर केला जायचा.
रिपोर्टनुसार, पूर्वीचे ग्राहकाला नवीन मोबाइल कनेक्शन घेण्यासाठी कोणताही सरकारी आयडी, जसे की व्होटर आयडी किंवा पासपोर्ट द्यावे लागत होते. पण, आता नवीन सिम कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी आधारद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे. या नियमाचे पालन केल्याशिवाय किरकोळ विक्रेते यापुढे सिमकार्ड विकू शकणार नाहीत.
बनावट सिमकार्डवर सरकारची कडक कारवाईदूरसंचार क्षेत्राच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक घोटाळ्यात बनावट सिमकार्डची भूमिका असल्याचे उघड झाले. तपासात अनेक सिम कार्ड एकाच मोबाईलशी जोडल्याशी आढळले. हे दूरसंचार नियमांचे उल्लंघन असून, सायबर गुन्ह्यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमओने निर्देश दिले PMO ने दूरसंचार विभागाला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना सहकार्य करण्याचे आणि गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बनावट कागदपत्रांचा वापर करून सिमकार्ड जारी करणाऱ्या रिटेल विक्रेत्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि बनावट सिमकार्डची खरेदी थांबवण्यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.