शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Electricity Bill: वीजबिल अचानक वाढलंय? महावितरणकडे तक्रार करण्यापूर्वी 'हे' एक काम करा; हजारो रुपयांची होईल बचत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: सध्या सर्वत्र स्मार्ट मीटरच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आपले वीजबिल वाढून येत असल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सध्या सर्वत्र स्मार्ट मीटरच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आपले वीजबिल वाढून येत असल्याची तक्रार आहे. मात्र, वीजबिलात होणाऱ्या या वाढीमागे केवळ मीटर कारणीभूत नसून, घरातील सदोष ‘अर्थिंग’ किंवा ‘न्यूट्रल लिकेज’ हे मोठे तांत्रिक कारण असू शकते. तांत्रिक भाषेत सांगायचे तर, तुमच्या घरातील वीज गळती तुमच्या नकळत मीटरमधील युनिट्स वाढवत असते, ज्याचा भुर्दंड शेवटी ग्राहकालाच सोसावा लागतो. आपल्या घरातील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी फेज आणि न्यूट्रल अशा दोन तारांची आवश्यकता असते. विद्युत प्रवाह फेजमधून उपकरणात जातो आणि न्यूट्रलद्वारे परत फिरतो. जेव्हा घराचे अर्थिंग कमकुवत होते किंवा न्यूट्रल वायरमध्ये दोष निर्माण होतो, तेव्हा वीज प्रवाहाचा काही भाग जमिनीकडे वाहू लागतो. स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असतात. हे मीटर फेज आणि न्यूट्रल या दोन्ही वायरमधील विद्युत प्रवाहाची स्वतंत्रपणे नोंद ठेवतात. जर तुमच्या वायरिंगमध्ये दोष असेल आणि वीज गळती होत असेल, तर स्मार्ट मीटर ती नोंदवतो.

वीज गळतीची मुख्य कारणे 

अनेक वर्षांपासून न बदललेल्या वायर्सचे कोटिंग खराब होऊन भिंतीतून वीज गळती होऊ शकते. अर्थिंगचा खड्डा कोरडा पडणे किंवा तांब्याची पट्टी गंजणे यामुळे योग्य अर्थिंग मिळत नाही. फ्रीज, गिझर किंवा इस्त्री यांसारख्या धातूचे आवरण असलेल्या उपकरणांमधून वीज गळती होण्याची शक्यता जास्त असते. शेजाऱ्याच्या किंवा इतर सर्किटच्या न्यूट्रल वायरशी तुमच्या वायरिंगचा संबंध आल्यास मीटर वेगाने फिरू लागतो.

वीजबिल कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

आपल्या घरातील पूर्ण वायरिंगची 'इन्सुलेशन रेझिस्टन्स' टेस्ट परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी. घराच्या मेन स्विच बोर्डमध्ये 'अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर' किंवा आरसीसीबी बसवणे अत्यंत आवश्यक आहे. जर कुठेही वीज गळती झाली, तर हे उपकरण तात्काळ वीजपुरवठा खंडित करते, ज्यामुळे विजेचा धक्का बसण्यापासून बचाव होतो आणि बिलही वाचते. पावसाळ्यापूर्वी आणि उन्हाळ्यात अर्थिंगच्या खड्ड्यात पाणी व मीठ-कोळसा टाकून ओलावा टिकवून ठेवावा. स्मार्ट मीटर अचूक आहे तरी देखील जर अर्थिंग व्यवस्थित असूनही बिल जास्त वाटत असेल, तरच महावितरणकडे मीटर टेस्टिंगसाठी अर्ज करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : High Electricity Bill? Check Earthing Before Complaining, Save Thousands!

Web Summary : Rising electricity bills may stem from faulty earthing or neutral leakage, not just smart meters. Address wiring issues like insulation damage or poor earthing. Install an RCCB and maintain earthing pits. Test wiring before complaining to Mahavitran.
टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण