बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:01 IST2025-09-10T14:00:53+5:302025-09-10T14:01:01+5:30

जिओने एन्ट्री लेव्हल ट्रॅकिंग डिव्हाईसची किंमत १४९९ रुपये ठेवली आहे. अन्य कंपन्यांचेही जीपीएस ट्रॅकर बाजारात आहेत परंतू ते खूप महाग आहेत.

remember the Pune's wife tracking her husband and catching him...; Jio brought the device right away, once charged... | बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...

बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...

काही वर्षांपूर्वी पुण्यात महिलेने तिच्या पतीच्या कारला जीपीएस डिव्हाईस चिकटवून त्याला दुसऱ्या महिलेसोबत रंग उधळताना पकडले होते. तसेच ट्रॅकिंग डिव्हाईस रिलायन्स जिओने आणले आहे. ते कारमध्ये ठेवा किंवा बॅगमध्ये लपवा कुठेही गेले तरी त्याचे लोकेशन सांगणार आहे. अर्थात ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार याचा चांगला, वाईट वापर ठरणार आहे. परंतू, हे खूप उपयुक्त ठरणार आहे. 

जिओने एन्ट्री लेव्हल ट्रॅकिंग डिव्हाईसची किंमत १४९९ रुपये ठेवली आहे. अन्य कंपन्यांचेही जीपीएस ट्रॅकर बाजारात आहेत परंतू ते खूप महाग आहेत. यामुळे प्रत्येकालाच ते घेता येत होते असे नव्हते. तसेच त्यांची सेटअप प्रक्रिया क्लिष्ट होती. जिओचे हे प्रॉडक्ट वापरण्यासही सोपे आहेत. 

जिओने जिओफाईंड आणि प्रो असे दोन कॉम्पॅक्ट वायरलेस ट्रॅकर बनविले आहेत. हे तुम्ही लहान मुलांना ट्रॅक करण्यासाठी, बॅग किंवा एखादे पार्सल पाठविले तर ते देखील ट्रॅक करण्यासाठी वापरू शकता. जिओफाईंड प्रोची किंमत २४९९ रुपये आहे. जिओफाईंडमध्ये ११०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. एका चार्जवर हे डिव्हाईस ४ दिवस चालते.  

जिओफाईंड प्रोमध्ये १० हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे डिव्हाईस कार, शिपमेंट आदी सारख्या किंवा ज्या गोष्टींना जास्त दिवस ट्रॅक करायचे आहे त्यासाठी वापरू शकता. याला एक चुंबक देखील आहे, म्हणजे ते तुम्ही गुपचूप कार, स्कूटरला चिकटवू शकता. या दोन्ही डिव्हाईसमध्ये 4G कनेक्टिविटी देण्यात आलेली आहे. हे डिव्हाईस तुम्ही JioThings App ने कनेक्ट करू शकणार आहात. ओव्हरस्पीड अलर्ट, आजुबाजुचा आवाज ऐकण्याची देखील सोय, हिस्ट्री या डिव्हाईसमुळे मिळते. 
 

Web Title: remember the Pune's wife tracking her husband and catching him...; Jio brought the device right away, once charged...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ