शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 10:25 AM

जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

नवी दिल्ली : रिलायन्सजिओने गेल्या महिन्यात गिगा फायबर लाँच करून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता त्यातील खऱ्या बाबी बाहेर येऊ लागल्या आहेत. जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता पुरती निराशा होणार आहे. मोफत टीव्ही मिळेल पण कनेक्शन मिळणार नाही. 

जिओ 4 के सेट टॉप बॉक्स देणार आहे. मात्र, टीव्हीवर चॅनेल पाहण्यासाठी लोकल केबल ऑपरेटर किंवा अन्य केबल ऑपरेटरचे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे 699 सह केबलसाठीचे वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. जिओ फायबर युजरसाठी सध्या हाथवे, डेन आणि जीपीटीएल हाथवे सारखे प्रोव्हायडर केबल सर्व्हिस देत आहेत. जर तुम्हाला 4 के सेट टॉप बॉक्सवर कन्टेट पहायचा असेल तर यांच्याकडून केबल टीव्ही कनेक्शन घ्यावे लागणार आहे. 

जिओ फायबर नव्या ग्राहकांकडून 2500 रुपये डिपॉझिट घेत आहे. यापैकी 1 हजार रुपये इन्स्टॉलेशन चार्ज आहे, जो पत मिळणार नाही. 1500 रुपयांची रक्कम परत मिळणार आहे. जिओ फायबरच्या कनेक्शनसोबत ग्राहकाला सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे. 

आधी असे वाटले होते की कंपनी टीव्ही देत आहे तर कनेक्शन पण देणार. पण तसे नाहीय. रिलायन्स ग्राहकांसाठी IPTV (इंटरनेट प्रोटोकॉल टीव्ही) आणणार होती. मात्र, त्यात अपयश आले आहे. यामुळे कंपनीने हाथवे आणि डेन नेटवर्कमध्ये हिस्सा खरेदी केला आहे. तसेच IPTV ला स्थानिक केबल ऑपरेटराकडून विरोध होत होता. यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प होणार होता.  

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्स