मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 'फेस्टिव्ह ऑफर' अंतर्गत एक अतिशय किफायतशीर आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ₹450 किमतीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर प्रगत AI तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे मोठे पॅकेजही मिळत आहे.
साधारणपणे 28 दिवसांच्या वैधतेच्या तुलनेत हा प्लॅन 36 दिवसांची वैधता देतो. म्हणजेच वर्षाला ३६५ दिवसांसाठी तुम्हाला जी १३ रिचार्ज करावी लागतात ती आता ३६० दिवसांसाठी १० च करावी लागणार आहेत, उरलेल्या पाच दिवसांसाठी ११ वे रिचार्ज करावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो (एकूण 72GB डेटा). ज्या ग्राहकांकडे 5G फोन आहे आणि ते जिओच्या 5G कव्हरेजमध्ये आहेत, त्यांना Unlimited 5G डेटा वापरता येईल. तसेच देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळणार आहेत.
₹35,000 पेक्षा जास्त किमतीचे डिजिटल गिफ्ट्सया प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे अतिरिक्त फायदे आहेत.१. Google Gemini Pro: सुमारे ₹35,100 किमतीचे Google चे प्रगत AI 'Gemini Pro' चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत. २. JioHotstar: 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन, ज्यावर तुम्ही चित्रपट आणि क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. ३. Cloud Storage: 50GB मोफत JioAICloud स्टोरेज. ४. JioHome Trial: नवीन जिओहोम ब्रॉडबँड कनेक्शनवर 2 महिन्यांची फ्री ट्रायल.
Web Summary : Jio's festive offer includes a ₹450 plan with 36-day validity, 2GB daily data, unlimited calling, and 100 SMS/day. It offers Google Gemini Pro, JioHotstar subscription, 50GB cloud storage, and JioHome trial, providing significant digital benefits.
Web Summary : जियो के फेस्टिव ऑफर में ₹450 का प्लान शामिल है, जिसमें 36 दिनों की वैधता, 2GB दैनिक डेटा, असीमित कॉलिंग और 100 एसएमएस/दिन शामिल हैं। इसमें गूगल जेमिनी प्रो, जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन, 50GB क्लाउड स्टोरेज और जियोहोम ट्रायल जैसे डिजिटल फायदे भी हैं।