रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:35 IST2025-01-16T15:35:12+5:302025-01-16T15:35:56+5:30
Reliance Jio Plan: या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.

रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...
Reliance Jio Plan: मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील Jio देशभरात आपल्या 5G नेटवर्कचा विस्तार करत आहे. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन प्लॅन्स आणत आहे. आम्ही अशाच एका Jio प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला रिचार्जवर 'कॅशबॅक' मिळते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॅशबॅकसोबत इतर अनेक बेनिफिट्सही मिळतात.
जिओचा 1028 चा प्लॅन
Jio च्या 1028 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, SMS अन् कॅशबॅकसह अनेक अॅडिशनल फायदे मिळतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला दररोज 2 GB हाय स्पीड डेटा देते. याशिवाय अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसदेखील दिले जातात.
जिओ 1028 प्लॅनची वैधता
1028 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
अतिरिक्त फायदे
या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema व्यतिरिक्त Swiggy One Lite चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच, कंपनी 50 रुपयांचा कॅशबॅकही देत आहे. Jio चा हा एकमेव प्लॅन आहे, ज्यात 50 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.