शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Reliance Jio : जिओची भन्नाट ऑफर! फक्त 10 रुपयांत 1GB डेटा आणि कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 13:38 IST

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे.

ठळक मुद्देरिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. जिओचा सर्वात स्वस्त टॉपअप प्लॅन फक्त 10 रुपयांचा आहे.10 रुपयांच्या रिचार्जमध्ये 124 IUC मिनिटं आणि एक जीबी डेटाही देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. जिओच्या ग्राहकांना अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन्ससह व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि डेली डेटासारखे अनेक फायदे मिळतात. काही महिन्यांपूर्वी जिओने IUC चार्ज आकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ग्राहक नाराज झाले होते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारणी होऊ लागली होती. त्यानंतर ग्राहकांसाठी जिओने प्रीपेड प्लॅनसह नॉन जिओ मिनिटे देण्यास सुरुवात केली. 

जिओचं डेटा वाऊचर 11 रुपयांपासून सुरू होतं ज्यामध्ये 400 एमबी डेटा ग्राहकांना दिला जातो. तर आययूसी टॉक वाऊचरची सुरुवात ही 10 रुपयांपासून होते. त्यामुळे जिओचा सर्वात स्वस्त टॉपअप प्लॅन फक्त 10 रुपयांचा आहे. या 10 रुपयांच्या रिचार्जमध्ये 124 IUC मिनिटे मिळतात. तसेच एक जीबी डेटाही देण्यात आला आहे. त्यामुळे अन्य नेटवर्कवर ग्राहक कॉल करण्यासाठी जितक्या वेळेस 10 रुपयांचा टॉप अप करणार तितक्या वेळेस त्याला एक जीबी डेटा मोफत मिळणार आहे. 

रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ

डेली डेटा संपल्यानंतर ग्राहकाला 3 जीबी अथवा त्यापेक्षा जास्त डेटा हवा असल्यास जास्त किंमतीचं आययूसी टॉक टाइम वाऊचर रिचार्ज करावा लागणार आहे. 50 रुपयांचं आययूसी टॉक टाइम वाऊचर रिचार्ज  केल्यास 39.37 रुपये म्हणजेच 656 आययूसी मिनिटे मिळणार आहेत. त्यासोबतच 5 जीबी फ्री डेटा मिळणार आहे. तसेच 51 रुपयांच्या डेटा वाऊचरवर 3 जीबी डेटा मिळणार आहे. जास्त डेटा हवा असल्यास रिलायन्स जिओचा 251 रुपयांचं डेटा वाऊचर बेस्ट आहे. 51 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये डेटासोबतच 2 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. 

JIO Wifi Calling Feature : जिओची नवीन सेवा; व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग होणार फ्री

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात आणखी एक सेवा भेट दिली आहे. देशभरात कुठेही आणि कोणत्याही 'वाय- फाय'वर काम करणारी व 150 पेक्षा अधिक  हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करणारी राष्ट्रव्यापी व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेची रिलायन्स जिओने सुरुवात  केली. जिओच्या या नवीन सेवेमुळे आता कोणत्याही अतिरिक्त शुल्क विना वाय-फायद्वारे स्पष्ट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओInternetइंटरनेटMobileमोबाइल