reliance jio ended rs 19 and rs 52 recharge plans after iuc know about | जिओने बंद केले दोन 'छोटे' प्लॅन; तीन 'मोठे' रिचार्ज प्लॅन लाँच!
जिओने बंद केले दोन 'छोटे' प्लॅन; तीन 'मोठे' रिचार्ज प्लॅन लाँच!

नवी दिल्लीः रिलायन्स जिओनं IUC शुल्क लावल्यानंतर दोन प्लॅन बंद केले आहेत, त्याऐवजी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. आययूसी शुल्क वसूल करणारे प्लॅन्स आल्यानंतर कंपनीनं 19 रुपये आणि 52 रुपयांचे रिचार्ज पॅक बंद केले आहेत. जिओनं 10 ऑक्टोबरला IUCचे चार डेटा प्लॅन भारतीय बाजारात उपलब्ध करून दिले होते. ज्या युजर्सचे जिओ सोडून दुसऱ्या नेटवर्कवर जास्त कॉल होतात, ते या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात. तसेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा मिळणार आहे. ग्राहकांना 19 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 150 एमबी डेटा मिळत होता. तसेच त्याशिवाय 20 SMSची सुविधाही देण्यात आली होती. दुसरीकडे 52 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. त्याशिवाय 70 SMSचाही लाभ मिळत होता. परंतु जिओनं आता हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत. तर दुसरीकडे तीन मोठे प्लॅन लाँच केले आहेत. जिओ 222 रुपयांत दरदिवशी 2 जीबी डेटा आणि जिओच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कला फोन केल्यास 1000 मिनिटे मोफत देणार आहे. जिओ 222 रुपयांत महिन्याभर ही सेवा देणार असून, 333 रुपयांत दोन महिने, तर 444 रुपयांत हीच सुविधा तीन महिन्यांसाठी मिळणार आहे. 

रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच युजर्सला नव्या प्लॅनसाठी IUC शुल्क द्यावे लागणार आहेत. त्यासाठी वेगळा आययूसी टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत.  आता युजर्ससाठी 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आययूसी चार्ज पॅक उपलब्ध आहे. 10 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी आणि 100 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी अतिरिक्त डेटा युजर्सना मिळणार आहे. तसेच 10 रुपयांच्या वाउचरमध्ये 124 मिनिटांचं नॉन जिओ टॉकटाईम तर 100 रुपयाच्या वाउचरमध्ये 1,362 मिनिटांचा टॉकटाईम देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने  पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. या वन-टाईम ऑफर प्लॅनच्या घोषणेनंतर पहिल्या 7 दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे.

 

लवकरच येणार नवीन रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओ हे दोन्ही रिचार्ज प्लॅन 2020ला पुन्हा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ट्राय आययूसीला जानेवारी 2020पर्यंत हटवू शकते. परंतु ट्रायनं आययूसीसंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. काही ग्राहकांनी जिओच्या प्लॅनवर टीका केली आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत.  


Web Title: reliance jio ended rs 19 and rs 52 recharge plans after iuc know about
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.