Jio चे शानदार प्लॅन्स! 150 रुपयांत दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 13:06 IST2022-01-26T13:06:00+5:302022-01-26T13:06:40+5:30
reliance jio cheapest plans : आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा तीन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे एअरटेल आणि व्होडाफोन-आयजडियाच्या प्लॅनपेक्षाही शानदार आहेत.

Jio चे शानदार प्लॅन्स! 150 रुपयांत दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही...
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ( Reliance Jio) आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यानंतरही असे प्लॅन्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे, परंतु फायदे जबरदस्त मिळत आहेत. जर तुम्हीही कमी दिवसांचा प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला 150 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. तसेच, आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा तीन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे एअरटेल आणि व्होडाफोन-आयजडियाच्या प्लॅनपेक्षाही शानदार आहेत.
जिओचा 149 रुपयांच्या प्लॅन
जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 दिवसांची व्हॅलिटीडी मिळत आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 20 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील उपलब्ध आहे.
जिओचा 152 रुपयांच्या प्लॅन
जिओचा हा प्लॅन जिओ फोन यूजर्ससाठी आहे. 152 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 0.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 14 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील देण्यात आला आहे.
जिओचा 179 रुपयांच्या प्लॅन
जिओच्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा देखील अॅक्सेस उपलब्ध आहे.