दिवाळीत सादर होईल रिलायन्स जियोचा बजेट फोन; फोनसाठी गुगलसोबत केली आहे भागीदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:54 IST2021-06-04T17:54:09+5:302021-06-04T17:54:40+5:30
Reliance Jio Smartphone: 24 जूनला होणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची घोषणा केली जाऊ शकते.

दिवाळीत सादर होईल रिलायन्स जियोचा बजेट फोन; फोनसाठी गुगलसोबत केली आहे भागीदारी
Reliance दिवाळीपूर्वी आपला नवीन किफायतशीर स्मार्टफोन लाँच करू शकते. रिलायन्स जियोने या आगामी स्मार्टफोनसाठी Google सोबत भागेदारी केली आहे. रिलायन्स आणि गुगलच्या भागीदारीच्या माध्यमातून बनवण्यात येणाऱ्या या स्मार्टफोनची चाचणी विंगटेक मोबाईल्स, डिक्सॉन टेक्नोलॉजी, यूटीएल नियोलॉइन्स आणि फ्लॅक्सट्रॉनिक्स टेक्नोलॉजीजच्या फॅक्टरीमध्ये केली जात आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. (Reliance Jio and Googles exclusive budget phones R&D is complete)
जियो आणि गुगलच्या या स्मार्टफोनचे संशोधन पूर्ण झाले आहे. ब्रोकेज फर्म UBS च्या रिपोर्ट्सनुसार, या 4G स्मार्टफोनची किंमत 3600 रुपये असू शकते. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग येत्या काही महिन्यांमध्ये सुरु केली जाऊ शकते.
एका रिपोर्टमध्ये ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने सांगितले आहे कि, 24 जूनला होणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची घोषणा केली जाऊ शकते. परंतु हा फोन लाँच होण्यास मात्र त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या परवडणाऱ्या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनी भारतातील करोडो फिचर फोन युजर्सना लक्ष्य करत आहे.
जियोच्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत ब्रोकेज फर्म UBS ने अंदाज लावला आहे कि, या फोनची किंमत 3600 रुपयांपर्यंत असू शकते. दुसरीकडे इकॉनॉमिक टाइम्सने दावा केला आहे कि कंपनी दोन मॉडेल टेस्ट करत आहे त्यातील एक 4G स्मार्टफोन आणि एक 5G स्मार्टफोन असू शकतो.