नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंटस्ट्रीज आणि अमेरिकेतील टेक कंपनी फेसबुक संयुक्तरित्या एक नवीन अॅप लॉन्च करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक आणि रिलायन्स एक अशा सुपर अॅपची निर्मिती करणार आहेत की ज्यामुळे अनेक कामे होऊ शकतील.
चीनचे अॅप WeChatच्या पॅटर्ननुसार या अॅपची निर्मिती करण्याची शक्यता आहे. WeChat हे अॅप मेसेजिंगसोबत अनेक सुविधा पुरविते. रिपोर्टनुसार, फेसबुक आणि रिलायन्सच्या अॅपमध्ये मेसेज शिवाय ग्रॉसरी शॉपिंग, रिचार्ज आणि पेमेंट यासारख्या सुविधा देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
असे सांगण्यात येत आहे की सुपर अॅपमध्ये गेम, हॉटेल बुकिंग आणि सोशल मीडियाच्या सुविधा मिळणार आहेत. भारतात WhatsApp आणि Facebookचे मोठ्याप्रमाणात युजर्स आहेत. याचा या अॅपला होऊ शकतो.
रिलायन्स बाबत बोलायचे झाले, तर भारतात रिलायन्स जिओचे भरपूर युजर्स आहेत. या युजर्समधील जास्ततर लोक जियो अॅपचा वापर करतात. रिलायन्सजवळ विविध नेटवर्क आहे. यामध्ये रिलायन्स रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स, फिल्म अॅप आणि पेमेंट अॅप आहे.
फेसबुक आणि रिलायन्सच्या सुपर अॅपची निर्मिती झाली, तर यामध्ये रिलायन्स आपल्या विविध सुविधांचा समावेश करेल. तसेच, फेसबुकचा रीच पाहता दोन्ही कंपन्यांना फायदा होईल.
फेसबुक टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया, इंस्टंट मेसेजिंग फ्रंटवर या अॅपमध्ये युजर्सला सुविधा देईल. अशाप्रकारच्या सुविधा चीनचे अॅप WeChat मध्ये आहेत. जसे की, मेसेजिंग आणि शॉपिंगपासून ते पेमेंटपर्यंतच्या सुविधा आहेत.
ET च्या एका रिपोर्टनुसार, या टीमच्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, एक नवीन कंपनी तयार केली जाऊ शकते. यासाठी दोन्ही कंपन्या गुंतवणूक करु शकतात किंवा फेसबुक कंपनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुतंवणूक करु शकते.
गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती आली होती की, फेसबुक कंपनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणार आहे. १० टक्के स्टेक्स खरेदी करणार आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही कंपन्यांनी याबाबत अधिकृत काहीच जाहीर केले नाही.