कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 21:59 IST2025-07-29T21:57:58+5:302025-07-29T21:59:18+5:30

Redmi Note 14 SE 5G: शाओमी कंपनीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट १४ एसईने बाजारात धमाका केला आहे. 

Redmi Note 14 SE 5G launched in India with 5110mAh battery, priced under 15000: Specifications, features and more | कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!

कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!

दीर्घ प्रतीक्षेनंतर शाओमी कंपनीचा रेडमी नोट १४ एसई स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च झाला आहे. हा एक परवडणारा फोन आहे. रेडमी नोट १४ सीरिज गेल्या वर्षी जागतिक बाजारात लॉन्च झाली.   रेडमी १४ सीरिजमध्ये रेडमी नोट १४ ५जी, रेडमी नोट १४ प्रो ५जी आणि रेडमी नोट १४ प्रो प्लस या तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. या यादीत आणखी एक स्मार्टफोन जोडला गेला आहे.

रेडमी नोट १४ एसईमध्ये ग्राहकांना ६.६७-इंचाचा फुल एचडी + एमओईएलडी डिस्प्ले देण्यात आला आहे, त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे आणि पीक ब्राइटनेस २१०० निट्स आहे.  फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ओआयएस सपोर्टसह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

फोनमध्ये ५,११० एमएएच बॅटरी आहे. लॉक आणि अनलॉक करण्यासाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन नवीन क्रिमसन आर्ट रंगात लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन १४ हजार ९९९ रुपयांना लॉन्च केला आहे, त्याची विक्री ७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.

पहिल्या सेलमध्ये फोनवर १०० रुपयांची सूट उपलब्ध असेल. निवडक बँकांच्या कार्डने पेमेंट केल्यास ही ऑफर उपलब्ध असेल. रेडमी नोट १४ एसईच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे.

Web Title: Redmi Note 14 SE 5G launched in India with 5110mAh battery, priced under 15000: Specifications, features and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.